IPL साठी पाकिस्तानी खेळाडूने खेळला मोठा डाव?

पाकिस्तान क्रिकेटर्सला भारतात खेळण्याची ईच्छा असली तरी ती तूर्तास पूर्ण होईल, याची कोणतीही शक्यता दिसत नाही.
IPLmohammad amir
IPLmohammad amirTwitter
Updated on

वयाच्या 28 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती घेणारा पाकिस्तानचा जलगती गोलंदाज मोहम्मद आमिर (Mohammad Amir) आगामी काळात आयपीएल खेळताना दिसू शकतो. भारतातील लोकप्रिय लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश नाही. दोन्ही देशातील तणावपूर्ण वातावरणामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटसंबंधामध्ये दरी निर्माण झाली आहे. पाकिस्तान क्रिकेटर्सला भारतात खेळण्याची ईच्छा असली तरी ती तूर्तास पूर्ण होईल, याची कोणतीही शक्यता दिसत नाही.

सध्याच्या घडीला आमिर इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. तो ब्रिटीश नाकरिक्तव घेण्यासाठी धडपडत आहे. जर त्याला इंग्लंडचे नागरिकत्व मिळाले तर आयपीएलचे दरवाजे त्याच्यासाठी खुले आहेत. यापूर्वी पाकिस्तानचा माजी अष्टपैलू अझर महमूद याने इंग्लंडकडून नागरिकत्व घेऊन आयपीएल स्पर्धेत खेळल्याचे पाहायला मिळाले होते.

IPLmohammad amir
IPL 2021 : 6 देशातील खेळाडू BCCI चं टेन्शन वाढवणार?

इंग्लंडमधील वास्तव्याबद्दल आमिर म्हणाला की, सध्याच्या घडीला याठिकाणी क्रिकेटचा आनंदही घेत आहे. अजून 6-7 वर्षे क्रिकेट खेळायचे आहे. माझी मुलं इंग्लंडमध्ये लहानाची मोठी होतील, असे सांगत पुन्हा पाकिस्तानला जाणार नाही, असेच त्याने म्हटले आहे. आमिरने डिसेंबर 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते. मिसबाह उल हक आणि वकार युनिस यांच्यावर गंभीर आरोप करत त्याने क्रिकेटला बायबाय केले होते.

नागरिकता मिळाल्यावर बऱ्याच गोष्टी बदलतील

ब्रिटिश नागरिकत्व मिळाल्यानंतर आयपीएल स्पर्धेत सहभागी होणार का? असा प्रश्नही मोहम्मद आमीरला विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला की, भविष्याविषयी कोणताही प्लॅन सध्या करत नाही. नागरिकता मिळाल्यानंतर अनेक गोष्टी बदलतील. पाकिस्तान क्रिकेटमधून बाहेर पडण्याच्या निर्णय कठीण होता. पण त्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता, असेही त्याने म्हटले आहे.

IPLmohammad amir
IPL 2021 : उर्वरित मॅचसाठी इंग्लंडमधून वाजली धोक्याची घंटा

चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाविरुद्ध केली होती लक्षवेधी कामगिरी

2017 च्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारतीय संघाला नमवले होते. या सामन्यात मोहम्मद आमिरने 6 ओव्हरमध्ये 16 धावा खर्च करुन 3 विकेट घेतल्या होत्या. यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि शिखर धवनची त्याने शिकार केली होती. मोहम्मद आमिरने पाकिस्तानकडून 36 कसोटी, 61 वनडे आणि 50 टी20 सामने खेळले आहेत. वनडेत त्याने 81 आणि टी 20 मध्ये त्याने 59 विकेट घेतल्या आहेत. 2019 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या मोहम्मद आमीरला फिक्सिंग प्रकरणात बंदीचा सामनाही करावा लागला होता.

pakistan pacer mohammad amir apply for british citizenship For play ipl

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.