Wahab Riaz Retirement : आशिया कपपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाजाची अचानक घेतली निवृत्ती

Pakistan pacer Wahab Riaz announces his retirement
Pakistan pacer Wahab Riaz announces his retirement
Updated on

Pakistan pacer Wahab Riaz announces his retirement : आशिया कपपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज वहाब रियाझने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

रियाझने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पण 2020 पासून त्याला पाकिस्तानसाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यामुळे वयाच्या 38 व्या वर्षी त्याने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Pakistan pacer Wahab Riaz announces his retirement
Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप! PCB ने 15 हून अधिक खेळाडूंना बजावली नोटीस

वहाब रियाझने ट्विटद्वारे आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली. मी आंतरराष्ट्रीय खेळपट्टीवरून माघार घेत आहे. एका अविश्वसनीय प्रवासानंतर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबी, माझे कुटुंब, प्रशिक्षक, मार्गदर्शक, संघातील सहकारी, चाहते आणि मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

Pakistan pacer Wahab Riaz announces his retirement
Sunil Gavaskar : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पराभवात लाज वाटण्यासारखं काही नाही, गावसकरांनी दिला युवा खेळाडुंना सल्ला

वहाब रियाझची आंतरराष्ट्रीय कारकीर्द प्रदीर्घ होती. 2008 पासून आतापर्यंत त्याने एकूण 27 कसोटी, 91 वनडे आणि 36 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने कसोटीत 83, एकदिवसीय सामन्यात 120 आणि टी-20मध्ये 34 बळी घेतले. वहाब रियाझ त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी जगभर प्रसिद्ध होता.

या खेळाडूने पाकिस्तानसाठी तीन एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला होता. प्रथम 2011 मध्ये, नंतर 2015 मध्ये आणि त्यानंतर अलीकडेच 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत रियाझ देखील पाकिस्तान संघाचा भाग होता. 2011 च्या भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीत आणि 2015 च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने 5 विकेट्स घेतलेला स्पेल आजही सर्वांच्या आठवणीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.