Shoaib Akhtar : 'हे कसं काय झालं..' अख्तरचा बसेना विश्वास

पाकिस्तानच्या विजयाने माजी दिग्गज शोएब अख्तरला बसला धक्का
Shoaib Akhtar
Shoaib Akhtarsakal
Updated on

PAK Vs BAN Shoaib Akhtar Reaction : टी-20 विश्वचषक मध्ये बांगलादेशला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत गेला आहे. करा किंवा मरो या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला 128 धावांचे लक्ष्य दिले होते, जे पाकिस्तानने 5 विकेट्स गमावून पूर्ण केले. पाकिस्तानकडून बाबर आझमने 25 आणि रिझवानने 32 धावा केल्या. पाकिस्तानची गोलंदाज शाहीनने अप्रतिम गोलंदाजी करत 4 विकेट घेण्यात यशस्वी ठरला.

Shoaib Akhtar
PAK vs BAN Cheaters : नव्या वादाला तोंड फुटंल! पाकिस्तानवर फसवणूक केल्याचा आरोप

पाकिस्तानच्या विजयाने माजी दिग्गज शोएब अख्तरला धक्का बसला आहे. आज जेव्हा नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले तेव्हा अख्तरने एक ट्विट केले होते जे आता पाकिस्तानच्या विजयानंतर व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पराभवानंतर पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना उपांत्यपूर्व फेरीचा ठरला. अशा परिस्थितीत अख्तरने एका ओळीत ट्विट करत लिहिले, 'हे कसे झाले..' शोएब अख्तरचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने अप्रतिम गोलंदाजी करत 4 विकेट्स घेतल्या. शाहीनशिवाय पाकिस्तानकडून शादाब खानने 2 बळी घेतल्या. पाकिस्तानने बांगलादेशचा 5 विकेट्सने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारत आणि पाकिस्तान गट-2 मधून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर गट 1 मध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत पात्र ठरण्याची अप्रतिम कामगिरी केली आहे.

Shoaib Akhtar
BAN vs PAK | VIDEO : बदला! लिटन दासने पंचाच्या मांडीवर मारला चेंडू?

पाकिस्तानच्या या विजयामुळे सेमीफायनलची लढत रंजक झाली आहे. आता क्रिकेट चाहत्यांच्या मनातही आशा निर्माण झाली आहे की, टी-20 वर्ल्डकपचा ​​अंतिम सामना भारत आणि पाकिस्तानसोबत होऊ शकतो. यासाठी दोन्ही संघांना आपापल्या सेमीफायनलचे सामने जिंकावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.