कराची: पाकिस्तान सुपर लीग 2022 (Pakistan Super League) त्याच्या सामन्यांनी नाही तर वादग्रस्त घटनांनी गाजत आहे. आयपीएलमध्ये (IPL) हरभजन सिंगने श्रीसंतच्या कानशिलात लगावण्याची घटना जशी ऐतिहासिक ठरली, तशीत पीएसएलमध्ये वेगवान गोलंदाज हारिस रौफने (Haris Rauf) कामरान गुलामच्या कानशिलात लगावणारे प्रकरण गाजत आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात हारिस रौफने कामरान गुलामला (Kamran Ghulam) कानशिलात लगावली. हारिसने विकेट घेतल्यानंतर त्याचे अभिनंदन करणाऱ्या कामरानला काशिलात लगावली. त्यानंतर याला मैत्रीपूर्ण व्यवहार असे म्हणत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न देखील होत आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर या थप्पड की गूंज चा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. (PSL: Haris Rauf Slaps Kamran Ghulam)
लाहोर कलंदर्स (Lahore Qalandars) आणि पेशावर जाल्मी (Peshawar Zalmi) यांच्या सामन्यात हारिस रौफच्या गोलंदाजीवर कामरान गुलामने हजरतुल्ला जजईचा कॅच सोडला होता. मात्र याच षटकात रौफने मोहम्मद हारिसला बाद केले. या विकेटचे सेलिब्रेशन करताना हारिस रौफने गुलामला कानशिलात लगावली आणि त्याच्याकडे रागाने पाहत राहिला. मात्र गुलामने हा अपमान हसून गिळला. 17 व्या षटकात गुलामने पेशावर जाल्मीचा कर्णधार वहाब रियाजला धावबाद करत आपली योग्यता सिद्ध करून दाखवली. त्यावेळी हारिसने त्याला येऊन मिठी मारली.
पाकिस्तान प्रीमियर लीग सध्या वादांनी (PSL Controversy) गाजत आहे. विदेशी खेळाडू एलेक्स हेल्स आणि पॉल स्टर्लिंग यांनी वैयक्तिक कारण देऊन स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू जेम्स फाँकनरने फ्रेंचायजीने पैसे दिले नसल्याचा आरोप करत स्पर्धा अर्ध्यात सोडली. त्याने हॉटेलमधील काही किमती वस्तूंची तोडफोड देखील केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.