Pakistan TeamPakistan Team : पाकिस्तानचा संघ हा आता ऑस्ट्रेलियासोबत तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पर्थला रवाना झाला आहे. मात्र या सगळ्यात एका बातमीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले असून त्यावरुन वेगवेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
ज्युनिअर टीमच्या मॅनेरजला व्हिसाच मिळाला नाही...
माजी कसोटी फलंदाज शोएब मोहम्मदला युएईमध्ये जो अंडर १९ चा आशिया कप खेळवला जात आहे त्या टीमचा ज्युनिअर मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मात्र तो त्या टीमसोबत जाणार नाही. त्याविषयी माहिती देताना सुत्रांनी सांगितले की, शोएबच्या पासपोर्टची वैधता संपली आहे. त्यामुळे तो ते प्रकरण सोडविण्यात व्यस्त आहे.
पाकिस्तानी संघानं सध्या पीएम ११ सोबत सामना खेळला होता त्यात प्रभावी कामगिरी केली होती. कॅनबेरामध्ये झालेल्या सामन्यामध्ये पाकिस्तानी संघान ९ विकेट गमावत ३९१ धावांची खेळी करत डाव घोषित केला होता. त्यात कर्णधार शान मसूदनं नाबाद २०१ धावा केल्या होत्या.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे डॉक्टर सलीम यांना व्हिसा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना तो मिळतातच ते तातडीनं पर्थला रवाना होतील. मात्र क्रिकेटविश्वामध्ये ही बातमी व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानी संघावर वेगवेगळ्या प्रकारे टीका होताना दिसत आहे.
१४ डिसेंबर पासून होणार कसोटीला सुरुवात...
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानं यांच्यातील पहिल्या कसोटीला १४ डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. पर्थ मध्ये हा सामना पडणार असून त्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. या सामन्यासाठी डावखुरा फलंदाज सॅम आयुब अन् वेगवान गोलंदाज खुर्रम शहजाद यांना संघात जागा मिळाली आहे. २१ वर्षांच्या आयुबनं स्थानिक क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले होते.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन कसोटी सामने होणार असून त्यामध्ये पाकिस्तानच्या संघामध्ये शान मसूद (कप्तान), आमिर जमाल, अब्दुला शफीक, साजिद खान, बाबर आझम, फहीम अशरफ, हसन अली,इमाम उल हक, खुर्रम शहजाद, मीर हमजा, एम रिझवान, मोहम्मद वसीम, नोमान अली, सॅम आयुब, सलमान आगा, सरफराज अहमद, सऊद शकील आणि शाहिन आफ्रीदी यांचा समावेश आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.