अवघ्या 20 धावांत 7 विकेट्स; कांगारुंनी मोडले पाकचे कंबरडे

Pakistan vs Australia, 3rd Test
Pakistan vs Australia, 3rd TestSakal
Updated on

Pakistan vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या लाहोर कसोटी सामन्यात दमदार सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. पाकिस्तान संघाने (Pakistan Cricket Team)अवघ्या 20 धावांत 7 विकेट्स गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने (Australia Cricket Team)तासाभरात सामन्यात दमदार कमबॅक केल्याचे चित्र पाहायला मिळाले. पाकिस्तान संघांचा पहिला डाव तिसऱ्या दिवसाअखेर 268 धावांत आटोपला. पहिल्या डावात 391 धावा केलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली असून तिसऱ्या दिवसाअखेर त्यांनी दुसऱ्या डावातील बिनबाद 11 धावांसह 134 धावांची आघाडी घेतली होती.

Pakistan vs Australia, 3rd Test
IPL 2022: आयपीएल सामन्यात घुमणार प्रेक्षकांची 'विसल पोडू'

रावळपिंडी आणि कराची कसोटी सामन्या अनिर्णित राहिल्यानंतर दोन्ही संघातील तिसरा सामना मालिकेच्या निकालासाठी निर्णायक ठरणार आहे. पाकिस्तानच्या पहिल्या डावात सलामीवीर अब्दुल्लाह शफिख (Abdullah Shafique) 81 (228), अझर अली (Azhar Ali) 78 (208) आणि बाबर आझम (Babar Azam) 67 (131) यांनी चिवट खेळी करत अर्धशतके झळकावली. पण त्यानंतर एकाही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. तळाच्या फलंदाजीतील चौघांना तर खातेही उघडता आले नाही. तिसऱ्या दिवशी पाकिस्तान संघाची अवस्था 3 बाद 214 धावा अशी होती. 248 धावावंर फवाद आलमच्या रुपात पाकने चौथा गडी गमावला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. अवघ्या 20 धावांत त्यांनी 7 विकेट्स गमावल्या.

Pakistan vs Australia, 3rd Test
ICC Women’s Rankings: स्मृती, यस्तिकाचे रँकिंग सुधारले; मितालीची घसरण

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिंन्स (5 विकेट) आणि मिचेल स्टार्क (4 विकेट) यांच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानी फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. ऑस्ट्रेलियाच्या या दोन्ही अनुभवी गोलंदाजांनी मिळून नऊ विकेट्स घेतल्या.

अशा पडल्या विकेट्स

पाकिस्तान के विकेट

चौथी विकेट- फवाद आलम (13) बोल्ड मिचेल स्टार्क, धावा 248

पाचवी विकेट- मोहम्मद रिझवान (1) बोल्ड मिचेल स्टार्क, धावा 256

सहावी विकेट- साजिद खान (6) बोल्ड पॅट कमिन्स, धावा 264

सातवी विकेट- नौमन अली (0) LBW पॅट कमिन्स, स्कोर 268

आठवी विकेट- हसन अली (0) कॅच स्मिथ बॉलिंग पॅट कमिन्स, धावा 268

नववी विकेट- बाबर आझम (67) LBW मिचेल स्टार्क, धावा 268

दहावी विकेट- नसीम शाह (0) बोल्ड मिचेल स्टार्क, धावा 268

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.