PAK vs ENG Final : इंग्लंड वनडे पाठोपाठ टी-20 चेही विश्वविजेते; पाकिस्तानचा केला पराभव

पाकिस्तानला पराभूत करून इंग्लंड बनला T20 चॅम्पियन
PAK vs ENG Final
PAK vs ENG Final
Updated on

PAK vs ENG Final Cricket Score : इंग्लंडने पाकिस्तानचा 5 विकेट्सनी पराभव करत टी 20 वर्ल्डकप 2022 वर आपले नाव कोरले. इंग्लंडने 2019 चा वनडे वर्ल्डकप देखील जिंकला आहे. आता टी 20 वर्ल्डकप जिंकत इंग्लंडने इतिहास रचला. इंग्लंडच्या विजयात बेन स्टोक्सने नाबाद 52 धावा करत मोठे योगदान दिले.

इंग्लंडने पाकिस्तानची 20 षटकात 8 बाद 137 धावा अशी अवस्था केली असली तरी पाकिस्तानने देखील इंग्लंडला पॉवर प्लेमध्ये धक्के दिले. शाहीन आफ्रिदीने अॅलेक्स हेल्सचा 1 धावेवर त्रिफळा उडवला तर चौथ्या षटकात हारिस रौऊफने फिलिप सॉल्टला 10 धावांवर बाद केले. दरम्यान, इंग्लंडचा डाव एकहाती सांभाळून आक्रमक सुरूवात करणाऱ्या जॉस बटरला हारिस रौऊफने 26 धावांवर बाद केले. बटरलने 17 चेंडूत 26 धावा करत इंग्लंडला पाच षटकात 43 धावांपर्यंत पोहचवले होते.

मात्र पाकिस्तानच्या कसलेल्या गोलंदाजांनी दमदार मारा करत इंग्लंडला फार धावा करू दिल्या नाहीत. त्यानंतर शादाब खानने 23 चेंडूत 20 धावा करणाऱ्या हॅरी ब्रुक्सला बाद केले. यामुळे बॉल टू रन असलेला सामना आता 15 व्या षटकात 30 चेंडूत 41 धावा असा आला. मात्र 16 वे षटक टाकणारा शाहीन एक चेंडू टाकून थांबला आणि इंग्लंडने सामन्यावर पुन्हा परक मिळवली.

त्याचे हे षटक पूर्ण करण्यासाठी कर्णधाराने इफ्तिकार अहमदकडे चेंडू सोपवला. मात्र त्याने या षटकात एक षटकार आणि एक चौकारासह 13 धावा दिल्या. इथेच इंग्लंडने सामन्यावर पुन्हा पकड मिळवली. बेन स्टोक्स आणि मोईन खानने आक्रमक फटकेबाजी करत सामना जवळ आणला. बेन स्टोक्सने 49 चेंडूत 52 धावांची खेळी करत इंग्लंडचा विजय निश्चित केला. त्याला अलीने 13 चेंडूत 29 धावा करत चांगली साथ दिली.

इंग्लंडच्या सॅम करनने टी 20 वर्ल्डकपच्या फायनल सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. त्याने 4 षटकात फक्त 12 धावा देत पाकिस्तानचे 3 फलंदाज टिपले. याचबरोबर आदिल राशिदने बाबर आझम हा हुकमी एक्का बाद करत मोलाचे योगदान दिले. त्याने 22 धावा देत 2 विकेट घेतल्या. ख्रिस जॉर्डननेही 2 विकेट घेत आपला हातभार लावला. यामुळे पाकिस्तानला 20 षटकात 8 बाद 137 धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक 38 धावा केल्या. तर कर्णधार बाबर आझमने 32 धावा केल्या.

ENG 84/4 (12.3) : पाकिस्तानने इंग्लंडच्या नाड्या आवळल्या

पाकिस्तानच्या कसलेल्या गोलंदाजांनी दमदार मारा करत इंग्लंडला फार धावा करू दिल्या नाहीत. त्यानंतर शादाब खानने 23 चेंडूत 20 धावा करणाऱ्या हॅरी ब्रुक्सला बाद केले.

ENG 45/3 (5.3) : रौऊफने केली मोठी शिकार 

इंग्लंडचा डाव एकहाती सांभाळून आक्रमक सुरूवात करणाऱ्या जॉस बटरला हारिस रौऊफने 26 धावांवर बाद केले. बटरलने 17 चेंडूत 26 धावा करत इंग्लंडला पाच षटकात 43 धावांपर्यंत पोहचवले होते.

32-2 : इंग्लंडला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के

पाकिस्तानचे 138 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडला पाकिस्ताननेही पॉवर प्लेच्या सुरूवातीला दोन धक्के दिले. शाहीन आफ्रिदीने अॅलेक्स हेल्सचा 1 धावेवर त्रिफळा उडवला तर चौथ्या षटकात हारिस रौऊफने फिलिप सॉल्टला 10 धावांवर बाद केले.

131-8 : सॅम करनचा भेदक मारा

पाकिस्तानचा निम्मा संघ गारद झाल्यानंतर सॅम करन आणि ख्रिस जॉर्डनने उरलेल्या पाकिस्तान संघाला एका पाठोपाठ एक पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सॅम करनने 4 षटकात 12 धावा देत 3 विकेट घेतल्या. तर ख्रिस जॉर्डनने दोन आणि आदिल राशिदने देखील 2 बळी टिपले

PAK 121/5 (16.3) : आक्रमक शान मसूद देखील परतला

पाकिस्तानची अवस्था 4 बाद 85 अशी झाली असताना शान मसूदने 28 चेंडूत 38 धावा करून पाकिस्तानचा डाव सावरला होता. मात्र सॅम करनने त्याला 17 व्या षटकात बाद करत पाकिस्तानला पाचवा धक्का दिला.

 PAK 85/4 (12.3) : पाकिस्तानच्या फलंदाजीला खिंडार 

राशिद खानने पाकिस्तानचा हुकमी एक्का बाबर आझमला गारद केल्यानंतर पुढच्याच षटकात बेन स्टोक्सने इफ्तिकार अहमदला शुन्यावर बाद करत पाकिस्तानला चौथा धक्का दिला.

PAK 84/2 (11) : राशिद खानने पाकिस्तानचा कर्णधार टिपला

हारिस बाद झाल्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि शान मसूद यांनी पाकिस्तानचा डाव सावरत धावगती वाढवण्यास सुरूवात केली. मात्र राशिद खानने पुन्हा एकदा पाकिस्तानला मोठा धक्का देत 24 चेंडूत 39 धावांची भागीदारी फोडली. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला 32 धावांवर बाद केले.

PAK 45/2 (7.1) : पाकिस्तानला दुसला धक्का

आदिल राशिदने पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. त्याने आक्रमक वृत्तीच्या मोहम्मद हारिसला 8 धावांवर बाद केले.

PAK 29/1 (4.2)  : सॅम करनने दिला मोठा धक्का 

सॅम करनने पाकिस्तानची जमू पाहणारी जोडी फोडली. त्याने मोहम्मद रिझवानला 15 धावांवर बाद करत 29 धावांवर पाकिस्तानला पहिला धक्का दिला.

दोन्ही संघांची प्लेइंग-11

पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह.

इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), अॅलेक्स हेल्स, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()