Pak vs Ned : ताकही फुंकून पिण्याची पाकिस्तानवर वेळ, दुबळ्या संघाविरुद्ध शेवटची संधी

पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर होणार का?
Pakistan vs Netherlands
Pakistan vs Netherlandssakal
Updated on

Pakistan vs Netherlands T-20 World Cup : सलग दोन पराभवांचे धक्के सहन करावे लागलेल्या पाकिस्तानचा आज नेदरलंडविरुद्ध सामना होत आहे. या लढतीतून ते पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असतील; परंतु झिम्बाब्वेकडून झालेल्या पराभवामुळे पाकचे खेळाडू आज ताकही फुंकून पिण्याची सावधगिरी बाळगतील.

Pakistan vs Netherlands
Ind vs Sa : आफ्रिकेविरुद्ध विजयी हॅट्ट्रिक? उपांत्य फेरी निश्चित करण्याची संधी

नेदरलँडचा संघ पाकपेक्षा किती तरी पटीने अनुभवात कमी आहे. एरवी या लढतीसाठी पाकने संघातील राखीव खेळाडूंना संधी दिली असती; पण आता ते कोणताही धोका पत्करणार नाही. ही लढत जिंकून विजयाचे पहिले गुण पाठीशी लावण्याबरोबर सरासरीही उंचावण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतील.

Pakistan vs Netherlands
MS Dhoni IND Vs RSA : आफ्रिकेविरूद्ध धावांचा पाऊस! धोनीनं पांड्या - पंतला दिली खास टिप्स

पाकला सर्वच क्षेत्रात सुधारणा करावी लागणार आहे आणि त्याची सुरुवात कर्णधार बाबर आझमपासून होणार आहे. बाबरचे अपयश भारत आणि झिम्बाब्वेकडून झालेल्या पराभवानंतर उठून दिसले. झिम्बाब्वेविरुद्ध माफक आव्हानही त्यांना गाठता आले नव्हते. त्यांचे सर्व माजी खेळाडू संघावर टीकांचे आसूड ओढत आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात पाकचे खेळाडू जोरदार खेळ करण्याची शक्यता आहे.

Pakistan vs Netherlands
Virat Kohli : विराट सर्वांत परिपूर्ण भारतीय फलंदाज; ग्रेग चॅपेल

पाककडे सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे; पण एकालाही ठसा उमटवता आलेला नाही. शहिन शहा आफ्रिदीच्या तंदुरुस्तीबाबत शंका उपस्थित केली जात आहे. आजच्या सामन्यात कदाचित त्याला वगळले जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.