Asia Cup 2022 INDW vs PAKW : महिला आशिया कपमधील भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभवाचा धक्का दिला. विशेष म्हणजे कालच थायलँडलने पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यात पाकिस्तानने भारताचा 13 धावांनी पराभव करत भारताला मोठा धक्का दिला. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 138 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताचा संपूर्ण डाव 124 धावात संपुष्टात आला. पाकिस्तानकडून नाशरा संधूने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर सादिका इक्बाल निदा दार यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. फलंदाजीत निदा दार नाबाद 56 धावांची खेळी केली. भारताकडून रिचा घोषने सर्वाधिक 26 धावा केल्या.
पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेल्या 138 धावांचा पाठलाग करताना भारताने 10 षटकात 50 धावा करत तीन फलंदाज गमावले. सलामीवीर स्मृती मानधना 17 धावांवर तर जेमिमा रॉड्रिग्ज 2 धावांवर बाद झाली. भारताची दुसरी सलामीवीर साभिनेनी मेघना देखील 15 धावांची भर घालून माघारी परतली. पाकिस्तानकडून नशरा संधूने दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
भारताच्या 50 धावात 3 विकेट गेल्यानंतर पूजा वस्त्रकार आणि हेमलता यांच्यावर डाव सावरण्याची जबाबदारी होती. मात्र हेमलता 20 धावांवर तर पूजा वस्त्रकार 5 धावा करून बाद झाली.
भारताचा निम्मा संघ माघारी गेल्यानंतर भारताची सर्व मदार कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दिप्ती शर्मा यांच्यावर होती. मात्र या दोघीही भारताली शंभरी पार करून देण्यापूर्वीच पॅव्हेलियनच्या वाटेला लागल्या. दिप्ती शर्मा 16 तर कौर 12 धावांवर बाद झाली. त्यानंतर राधा यादव देखील 3 धावांची भर घालून माघारी परतली.
एका बाजूने पडझड होत असताना दुसऱ्या बाजूने रिचा घोष आक्रमक फटकेबाजी करत होती. मात्र 13 चेंडूत 26 धावा करणाऱ्या रिचाला सादिया इक्बालने बाद केले. अखेर भारताला 6 चेंडूत 18 धावांची गरज असताना पाकिस्तानने भारताचा डाव 124 धावांवर संपवला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला भारताने पॉवर प्लेमध्येच दोन धक्के दिले. पूजा वस्त्रकारने सिदरा आमीनला 11 धावांवर बाद केले. त्यानंतर दिप्ती शर्माने सहव्या षटकात मुनिबा अलीला 17 धावांवर तर याच षटकात ओमैमा सोहैलला शुन्यावर बाद करत पाकिस्तानची अवस्था 3 बाद 33 अशी केली.
पाकिस्तानची पॉवर प्लेमध्ये 3 बाद 33 धावा अशी अवस्था झाली असताना कर्णधार बिसमाह मारूफ आणि निदा दार यांनी पाकिस्तानचा डाव सारवला. या दोघींनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला शतकी मजल मारून दिली. चौथ्या विकेटसाठी पाकिस्तानची कर्णधार मारूफ आणि दार यांनी 76 धावांची दमदार चभागीदारी रचली. मात्र ही भागीदारी रेणुका सिंगने मारूफला 32 धावांंवर बाद करत फोडली.
यानंतर पाकिस्तानच्या बाकीच्या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. निदा दारने 37 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी करून पाकिस्तानला 20 षटकात 6 बाद 137 धावांपर्यंत पोहचवले. भारताकडून दिप्ती शर्माने 3, पूजा वस्त्रकारने 2 तर रेणुका सिंहने 1 विकेट घेतली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.