'अयोध्येतील राम मंदिरात जो हिंदू जाईल तो मुस्लिम म्हणून बाहेर येईल...' पाकिस्तानी खेळाडूचा तो व्हिडिओ व्हायरल

Javed Miandad Video Viral
Javed Miandad Video Viral
Updated on

Javed Miandad Video Viral : अयोध्येतील भव्य राम मंदिरातील श्री रामलला यांच्या प्रतिमेच्या अभिषेकाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे अनेक जुने व्हिडिओही समोर येत आहेत. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार जावेद मियांदादचाही एक व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये मियांदाद अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराबाबत वादग्रस्त विधान करत असून, जो कोणी राम मंदिरात जाईल तो मुस्लिम म्हणून बाहेर येईल.

Javed Miandad Video Viral
Ind vs Aus Final Weather : भारत-ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये कसे असेल हवामान? पाऊस पडला तर काय... समजून घ्या गणित

जावेद मियांदाद व्हिडिओमध्ये काय म्हणाले ?

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीबाबत माजी पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियांदाद एका व्हायरल व्हिडिओमध्ये म्हणाला की... 'भारतात जे काही घडत आहे आणि ज्या प्रकारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तम काम केले आहे. त्यांच्यासाठी चांगले आहे, पण आमच्यासाठी नाही. पण मी खोलात जाऊन सांगतो की एका मशिदीचे मंदिरात रूपांतर झाले आहे.

पुढे तो म्हणाला की, इंशाअल्लाह, माझा विश्वास आहे की जो कोणी त्या मंदिरात जाईल तो मुस्लिम म्हणून बाहेर येईल. कारण आमची मुळे नेहमी त्याच्यातच असणार आहेत, जिथे आमच्या वडिलधाऱ्यांनी तबलीगी केली आहे, तिथे तुम्ही बघितलेच असेल, त्या गोष्टी तिथून जन्म घेतात. पण लोकांना समजणार नाही. इंशाअल्लाह, मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे की तिथून मुस्लिम बाहेर येतील.

माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादने 8 ऑगस्ट 2020 रोजी राम मंदिराच्या बांधकामासंदर्भात हा व्हिडिओ जारी केला होता. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय आणि मंदिराच्या बांधकामावर मियांदाद नाराज असल्याचे दिसून आले होते. पुन्हा एकदा मियांदादचा हा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

8 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराची पायाभरणी केली होती. 22 जानेवारी 2024 रोजी नव्याने बांधलेल्या राम मंदिरात रामललाच्या प्रतिमेचे अभिषेक करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी पंतप्रधानही चार दिवस अयोध्येत जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.