Mohammad Azharuddin : आमचं एकमतानं ठरायचं... पाकच्या माजी क्रिकेटपटूचा अझहरूद्दीनबाबत मोठा खुलासा

Mohammad Azharuddin Basit Ali
Mohammad Azharuddin Basit Aliesakal
Updated on

Mohammad Azharuddin Basit Ali : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना म्हणजे जणू जीवन मरणाचा प्रश्न असतो. क्रिकेटचं मैदान युद्धभूमीतच रूपांतरित झालेले असते. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना शिवीगाळ करणे, त्यांना टोमणे मारून चुका करण्यास भाग पाडणे असे प्रकार नेहमी सुरू असतात. सध्याच्या काळात जरी दोन्ही संघातील खेळाडू मैदानावर आणि मैदानाबाहेर देखील प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचा आदर करत असतात.

मात्र नव्वदीच्या दशकात भारत पाकिस्तान सामना म्हटलं की वाद आणि स्लेजिंग हे असायचंच. याच काळातील एक किस्सा पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अलीने सांगितला. त्याने पाकिस्तानचे क्रिकेटपटू भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझहरूद्दीन यांना स्लेज का करत नव्हते याचा खुलासा केला.

Mohammad Azharuddin Basit Ali
KL Rahul Athiya Shetty Marriage : लग्नात कोहलीनं दिलं 'विराट' गिफ्ट, तर, धोनीनं...

अलीने सांगितले की भारत पाकिस्तान सामन्यात भारतीय खेळाडूंना स्लेज करण्याची जबाबदारी त्याच्यवर असायची. त्याला सचिन तेंडुलकर, अजय जडेजा, नवज्योज सिंग सिद्धू आणि विनोद कांबळीला देखील स्लेज करण्यास सांगितले जायचे. मात्र कधी मोहम्मद अझहरूद्दीनला स्लेज करायला सांगण्यात आले नव्हते.

बासितने आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, 'भारताच्या प्रत्येक सामन्यापूर्वी मला भारतीय खेळाडूंना स्लेज करण्याची जबाबदारी दिली जायची. मला सचिन, जडेजा, सिद्धू, कांबळी यांना त्रास देण्यास सांगण्यात आले होते. मात्र ज्यावेळी मोहम्मद अझहरूद्दीन यांच नाव यायचं त्यावेळी संपूर्ण संघ एकमताने सांगायचा की अजहर भाईला कोणी त्रास द्यायचा नाही. आमच्या ड्रेसिंगरूममधल्या सर्वांच्या मनात अझहर भाईसाठी आदर होता. हा आदर शब्दात व्यक्त केला जाऊ शकत नाही.'

Mohammad Azharuddin Basit Ali
IND vs NZ: धडाकेबाज खेळीनंतर रोहित पत्रकारांवर संतापला; काय आहे कारण?

बासित अली पुढे म्हणाला की, 'वसीम अक्रम, सलीम मलिक, राशिद लतीफ, इंझमाम - उल - हक असो किंवा वकार युनूस असो कोणीही अझहर भाईला स्लेज करण्याची हिम्मत करत नव्हता. पाकिस्तानच्या कोणत्याही क्रिकेटपटूने अझहर भाईचा अपमान केलाय असं मला वाटत नाही. अझहर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायचे. मात्र ज्यावेळी सौरभ गांगुली आणि राहुल द्रविड सारखे खेळाडू आले त्यावेळी त्यांनी खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी युवा खेळाडूंना संधी दिली.'

(Sports Latest News)

हेही वाचा : 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.