Pakistan Cricketer : हे इतके नालायक आहेत हे की... पुराच्या पाण्यात खेळ करणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूवर नेटकरी जाम भडकले

Pakistan Cricketer Wahab Riaz Viral Video
Pakistan Cricketer Wahab Riaz Viral Videoesakal
Updated on

Pakistan Cricketer Wahab Riaz : पाकिस्तानचे क्रिकेटपटू कधी काय करतील याचा नेम नाही. काही पाक क्रिकेटपटू तर इन्स्टाग्रामवर आपला व्हिडिओ व्हायरल व्हावा यासाठी अजब गोष्टी करत असतात. आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाजने देखील असाच एक किस्सा केला. मात्र हा किस्सा त्याच्या चांगलाच अंगलट आला आहे.

नेटकरी वहाब रियाजच्या या कृतीवर जाम भडकले असून त्याने पाकिस्तानी गरीब जनतेची चेष्टा केल्याची टीका केली. पावसामुळे लाहोरमधील रस्त्यांवर प्रचंड पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यातून पाकिस्तानी जनता आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.

Pakistan Cricketer Wahab Riaz Viral Video
1983 World Cup : भारत नशीबानं जिंकला; संघात प्रभावी खेळाडूच नव्हते... विंडीजच्या माजी खेळाडूचे खळबळजनक वक्तव्य

काही दुभाजकावरून चालत तर काही दुचाकीवरून दबकत दबकत जात असताना वहाब रियाजने आलिशान चारचाकी गाडीतून या सामान्य पाकिस्तानी जनतेच्या अंगावर साचलेले पाणी उडवले. विशेष म्हणजे याचा व्हिडिओ करून तो शेअरही केला.

वहाब रियाजच्या या कृतीमुळे पाकिस्तानातील लोक जाम भडकले आहेत. सोशल मीडियावर वहाब रियाझला चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. या व्हायरल व्हिडिओत रियाज अजब पद्धतीने इकडे तिकडे फिरताना दिसतोय. ही गोष्ट नेटकऱ्यांना आवडली नाही.

Pakistan Cricketer Wahab Riaz Viral Video
Team India: टीम इंडियातून डच्चू दिल्यानंतर स्टार खेळाडूला कॅमेऱ्यासमोर कोसळले रडू, केला मोठा खुलासा

एका नेटकऱ्याने लिहिले की, 'लाहोरमध्ये पाणी साचलं आहे. त्यात आपली इज्जत शोधताना रियाज' दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, 'वहाब रियाज लोकांवर आपल्या गाडीने पाणी उडवत आहे. हा इतका नालायक आहे. पब्लिसिटी स्टंट करताना त्याने स्वतःचे खरे रूप दाखवले. व्हिडिओत स्पष्टच दिसते आहे की रिजाय आपली कार पाणी साचलेल्या रस्त्यावर वेगाने चालवत आहे त्यामुळे शेजारून जाणाऱ्या लोकांवर घाणेरडे पाणी उडत आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.