स्टेडीयम ओसाड! भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, पाकिस्तानी दिग्गजाने व्यक्त केली चिंता

भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचमध्ये स्टँड रिकामे; पाकिस्तानी दिग्गज म्हणाला,'हे कधीही पाहिले नव्हते..'
स्टेडीयम ओसाड! भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, पाकिस्तानी दिग्गजाने व्यक्त केली चिंता
Updated on

India vs Pakistan:भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे, पण प्रेक्षक गॅलरीत एकही चाहते उपस्थित नाही. याचा विचार करूनच विचित्र वाटतं, पण ते खरं आहे. अशीच काही दृष्य पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्येे सुरू असलेल्या आशिया चषकाच्या 16 व्या मोसमात पाहायला मिळत आहेत. सुपर-4 ची स्पर्धा सुरूच आहे. कोलंबोमध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आहेत. मात्र प्रेक्षक गॅलरीत क्रिकेटप्रेमींचा तुटवडा आहे.

काही स्टँड पूर्णपणे रिकामे असल्याची परिस्थिती आहे. या क्षणाची काही छायाचित्रे पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीजने शेअर केली आहेत. या चित्रांमध्ये क्वचितच कोणी चाहते दिसत आहेत. रिकाम्या स्टेडियमचा फोटो शेअर करताना, 42 वर्षीय माजी क्रिकेटरने लिहिले, 'पाकिस्तान विरुद्ध भारत सामन्याबद्दल क्रिकेट चाहत्यांची अशी प्रतिक्रिया यापूर्वी कधीही पाहिली नव्हती.

काही महिन्यांपूर्वी एका क्रिकेट दिग्गजाने अशी प्रतिक्रिया दिली होती की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर प्रेक्षकांना स्टेडियमपर्यंत खेचून आणायचं असेल, तर भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये सामने खेळवले गेले पाहिजे. मात्र, आजच्या या सामन्याची चित्र पाहून सर्व क्रिकेट रसिकांना मोठा धक्का बसला असणार आहे.

एका बाजूला विश्वचषकाचा भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान होणाऱ्या सामन्याची तारीख जाहीर होताचं, काही तासांतच सर्व तिकीटं विकली गेली, तर दुसऱ्या बाजूला आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीतील भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

सध्या आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना खेळवला जात आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला होता. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. भारताने प्रथम फलंदाजी करत धमाकेदार खेळी केली. भारताच्या दोन्ही सलामीवीरांना अर्धशतकं झळकावली.(Latest Marathi News)

स्टेडीयम ओसाड! भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, पाकिस्तानी दिग्गजाने व्यक्त केली चिंता
IND vs PAK : पावसाचा फायदा टीम इंडियाला?, पाकिस्तानला मिळू शकते मोठे लक्ष्य, जाणून घ्या गणित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.