Paralympic 2024: भारतीय बॅटमिंटनपटूचा 'Flying Return'; प्रतिस्पर्धी खेळाडूने मॅचनंतर उचलून घेतले

India at Paralympic 2024 : भारतीय बॅडमिंटनपटू पॅरालिम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. ही स्पर्धा जय-पराजयाच्या निकालापेक्षा मिळालेल्या संधीचा आनंद व्यक्त करण्याचं व्यासपीठ आहे. त्याची प्रचिती काल आली....
Sivarajan Solaimalai
Sivarajan Solaimalaiesakal
Updated on

Paris Paralympic 2024 Sivarajan Solaimalai :

पॅरालिम्पिक स्पर्धेत शुक्रवारी भारतीयांनी १ सुवर्ण, १ रौप्य व २ कांस्य अशा एकूण चार पदकांची कमाई केली. गुणतालिकेत भारतीय संघ टॉप टेनमध्ये आहे आणि आज त्या पदकसंख्येत भर पडण्याची शक्यता आहे. पण, जय-पराजयापलिकडे या स्पर्धेत खेळाडू त्यांच्या भावनांना वाट मोकळी करताना दिसत आहेत. भारतीय खेळाडूंच्या वाट्याला फार यश येताना दिसत नसले तरी त्यांच्या खेळाची दखल जग घेत आहे. बॅडमिंनटपटू शिवाराजन सोलैमलाईचा खेळ हा वरच्या दर्जाचा होतात.

पुरुष एकेरीच्या SH6 गटात भारतीय खेळाडूला हाँगकाँगच्या चू मॅन केई याच्याकडून पराभव पत्करावा लागला. पण, सामना जिंकल्यावर हाँगकाँगचा खेळाडू शिवराजनकडे धावला अन् त्याला उचलून घेतले. यावरूनच शिवराजन याचा खेळ किती अप्रतिम होता हे समजते. त्याने माललेला फ्लाईंग रिटर्न हा चर्चेत राहिला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केईने २१-१३, १९-२१, २१-१५ असा विजय मिळवला.

पुरुषांच्या SL3 प्रकारात कुमार नितेशने अ गटात मोंगखोन बुन्सूनचा २१-१३, २१-१४ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. SL4 प्रकारात सुहास एल यथीराजने २६-२४, २१-१४ अशा फरकाने कोरियाच्या शिन क्युंगविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवला. भारताचा दिग्गज तिरंदाज राकेश कुमार याने पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत विजयी धडाका कायम राखताना पुरुष कम्पाऊंड खुल्या गटाच्या उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेशस केला. त्याने सेनेगलच्या एलिओ ड्रॅमचा १३६-१३१ असा पराभव केला.

महिला गटातही दमदार कामगिरी पाहायला मिळाली, थुलसीमाथी मुरुगेसनने पोर्तुगालच्या बीट्रिझ मॉन्टेरियोवर २१-१२, २१-८ अशा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. नित्या स्रेनेही चायनीज तैपेईच्या कै यी-लिनचा २१-१२, २१-१९ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

या वर्षी, भारताने आतापर्यंतची सर्वात मोठी पॅरालिम्पिक तुकडी पाठवली आहे. १२ विविध क्रीडा प्रकारामध्ये ८४ भारतीय खेळाडू सहभाग घेणार आहेत. टोकियो २०२० हा भारताचा सर्वात यशस्वी पॅरालिम्पिक खेळ होता. तेव्हा भारताने पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्यांसह १९ पदके जिंकली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.