sheetal devi
sheetal deviesakal

Sheetal Devi: हात नाही? काही प्रॉब्लेम नाही...! शीतल देवीची पायाने तिरंदाजी अन् World Record; १ गुणाने हुकले अव्वल स्थान

Paralympic 2024 Sheetal Devi : २०२३ मध्ये १६ वर्षीय पॅरा-तिरंदाज शीतल देवीने आशियाई पॅरा गेम्समध्ये महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला होता.. त्याच शीतलने आज विश्वविक्रमाला गवसणी घातली.
Published on

India at Paralympics 2024 live Archery Sheetal Devi:

पॅरालिम्पिक स्पर्धेत सर्वांचे लक्ष होते ते तिरंदाज शीतल देवी हिच्या कामगिरीवर... १७ वर्षाच्या या पोरीने जगाला आपल्या तिरंदाजीच्या कौशल्याने चकित करून टाकले आहे... जन्मतः दोन्ही हात नसलेली शीतल पायाने तिरंदाजी करते आणि मागच्या वर्षी आशियाई सुवर्ण जिंकून तिने इतिहास घडवला. आज तिने पॅरालिम्पिक स्पर्धेतही वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. ७०० हून अधिक गुण कमावणारी ती पहिली भारतीय तिरंदाज ठरली, परंतु अवघ्या १ गुणाच्या फरकाने तिचे नंबर वन स्थान गेले.

Women's Individual Compound Open Ranking फेरीत भारताच्या पॅरा तिरंदाज शीतल देवीने पॅरिस ७२० पैकी ७०३ गुण मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड केला. शीतलने मागच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत ग्रेट ब्रिटनच्या जेसीका स्ट्रेटॉनचा ६९४ गुणांचा पॅरालिम्पिक विक्रम आणि ग्रेट ब्रिटनच्याच फोबी पॅटरसनचा ६९८ गुणांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. पण, शीतलचा वर्ल्ड रेकॉर्ड आजच तुर्कीच्या ओझनूर क्युरने काही क्षणात मोडला आणि तिने ७०४ गुणांसह वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.

sheetal devi
India at Paralympics 2024 Live: भारताला मोठा धक्का; Manasi Joshi पहिल्याच सामन्यात पराभूत

महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड स्पर्धेत ७०० पेक्षा जास्त गुण मिळवणारी ती पहिली महिला भारतीय पॅरा आर्चर ठरली आहे. ही तिची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवारमधील लोईधर गावातील शीतलचा जन्म... Phocomelia हा एक दुर्मिळ जन्मजात आजार तिला होता आणि त्यामुळे तिचे हात अविसकसित राहिले. २०२१ मध्ये तिच्या गावी भारतीय सैन्याने आयोजित केलेल्या युवा कार्यक्रमादरम्यान तिची क्रीडा प्रतिभा शोधली गेली. प्रशिक्षक आणि कुटुंबीयांनी कृत्रिम हात मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तो बसला नाही.

तिच्या पायांमध्ये ताकद आहे, याची तिला जाणीव झालील. जाणलं. सुरुवातीला तिरंदाजी करताना पाय दुखायचे पण तरी तिने माघार घेतली नाही. तिच्या प्रशिक्षकांनी स्थानिक साहित्य वापरून तिचे किट तयार केले होते. त्यांना तिच्यासाठी एक विशिष्ट्य शैलीही तयार करावी लागली. तिने सुरुवातीला रबर बँडने सरावाला सुरुवात केली. हळुहळू ती ५० मीटर अंतरावर बाण मारू लागली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...