Paralympic 2024: अपघात, नैराश्य अन् मिळाला खेळाचा आधार; नांदेडच्या भाग्यश्री जाधवचा संघर्ष

Paralympic 2024 Bhagyashree Jadhav: भारताचे ८४ खेळाडू पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यामध्ये ३२ महिला खेळाडूंचा समावेश आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने ५ सुवर्णपदकांसह एकूण १९ पदके जिंकली होती.
Paralympic 2024 Bhagyashree Jadhav
Paralympic 2024 Bhagyashree Jadhavesakal
Updated on

Paralympic 2024 India's Flag-Bearers Bhagyashree Jadhav:

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय पथकात महाराष्ट्राची लेक पदकासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे. भारताचे ८४ खेळाडू पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहेत आणि भारतीय दलाच्या ध्वजवाहकाचा मान महाराष्ट्राच्या भाग्यश्री जाधव हिच्यासह भालाफेकपटू सुमित अंतिल यांना मिळाला आहे. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सातव्या स्थानी समाधान मानावे लागणाऱ्या भाग्यश्रीने यंदा पदकाचा निर्धार केला आहे. १९ वर्षांची असताना भाग्यश्रीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.. ध्यानीमनी नसताना तिचा अपघात झाला आणि ती व्हिलचेअरवर आली.. त्यानंतर नैराश्य, नकारात्मकता याने ती खचली होती, परंतु तिच्या आयुष्यात खरंच काहीतरी वेगळं लिहिलं होतं अन् तेच घडलं...

१९८५ मध्ये महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवादाज येथे भाग्यश्रीचा जन्म.. २००६ मध्ये एका अपघाताने तिला व्हिलचेअरवर बसवले आणि ती प्रचंड मानसिक दडपणात गेली होती. २००६ मध्ये फिरायला बाहेर पडलेल्या भाग्यश्रीचा अपघात झाला आणि त्यानंतर तिने थेट १३ दिवसांनी डोळे उघडले. तिचा जीव वाचला, परंतु पाय गमावले. माझ्यासोबतच हे का झालं? आता पुढे काय होईल? ही चिंता तिला भेडसावत होती..

Paralympic 2024 Bhagyashree Jadhav
Paralympic 2024: जन्मत:च दोन्ही हात नव्हते, पण पायाच्या ताकदीवर शितलने परिस्थितीला हरवलं; ती आहे आजच्या युगाची 'अर्जुन'!

१९८५ मध्ये महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील होनवादाज येथे भाग्यश्रीचा जन्म.. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या भाग्यश्रीला घरच्यांनी धीर देण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ती नैराश्याच्या गर्तेत गेली होती. त्यामुळे तिची शारीरिक आणि मानसिक अवस्था ढासळलेली आणि हे पाहून तिच्या काकांचे २०१० मध्ये निधन झाले. हा भाग्यश्रीसाठी खूप मोठा मानसिक धक्का होता. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.

आता आयुष्य संपलंच असे तिचं ठाम मत झालं होतं आणि अशात पत्रकार प्रकाश कांबळे यांनी मदतीचा हात पुढे केला. त्यांनीच भाग्यश्रीला खेळांत प्राविण्य मिळवू शकते असा सल्ला दिला. व्हिलचेअरवर बसून कोणत्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ शकता, हे तिने जाणून घेतले. तिने २०१६ मध्ये पॅरालिम्पियन दीपा मलिक यांना खेळताना पाहिले होते आणि तिथूनच भाग्यश्रीला गोळाफेकीची निवड करण्याची प्रेरणा मिळाली.

Paralympic 2024 Bhagyashree Jadhav
Inspirational Story : शार्कच्या हल्ल्यात पाय गमावला, पण ती डगमगली नाही; १५ महिन्यांत Ali Truwit पॅरालिम्पिक गाजवण्यासाठी झाली सज्ज

२०१७ मध्ये तिने पहिल्यांदा स्पर्धेत सहभाग घेतला आणि पुण्याला झालेल्या महापौर चषकात तिला दोन सुवर्ण आणि एक कांस्यपदक जिंकलं. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भाग्यश्री Women's Shot Put F34 गटात सहभाग घेणार आहे. तिने जागतिक पॅरा अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२४ मध्ये रौप्यपदक जिंकले आहे. शिवाय २०२२च्या आशियाई पॅरा स्पर्धेत रौप्य व २०२१च्या वर्ल्ड कपमध्ये सुवर्णपदक तिने पटकावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.