अफगाणच्या रणरागिणीची तालिबानला 'किक'; टोकियोत पोहचली

दोन्ही अ‍ॅथलिट पॅरालिंपिक स्पर्धेत अफगाणिस्तानचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
Afghan athletes
Afghan athletes Twitter
Updated on

Tokyo Paralympics 2020 : तालिबानच्या राजवटीमुळे अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत एक चांगली बातमी समोर आली आहे. देशात चिंताजन वातावरण निर्माण झाल्यामुळे पॅरालिंपिक खेळाडूंचे दरवाजे बंद झाले होते. पॅरालिंपकच्या उद्घाटन सोहळ्यात अफगाणचा ध्वज फडकला. पण यावेळी अफगाणिस्तानचा एकही खेळाडू त्याठिकाणी उपस्थितीत राहिल्याचे दिसले नाही. देशातील गंभीर परिस्थितीत खेळाडूंचे टोकियोला जाण्याचा मार्ग बंदच झाला होता. मात्र या परिस्थितीतही अफगाणिस्तानमधील दोन अ‍ॅथलिट मोठी कसरत करत टोकियोला पोहचले आहेत. दोन्ही अ‍ॅथलिट पॅरालिंपिक स्पर्धेत अफगाणिस्तानचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

टोकियो पॅरालिंपिकमध्ये सहभागी होण्यासाठी अफगाणिस्तानची महिला अ‍ॅथलिट झाकिया खुदादादी (Zakia Khudadadi) आणि हुसेन रासोली (Hossain Rasouli) काबूलहून व्हाया पॅरिस जपानची राजधानी असलेल्या टोकियोत पोहचले आहेत. विशेष म्हणजे तालिबान राजवटीत महिलांवर अनेक निर्बंध येणार असल्याची चर्चा रंगत असताना या परिस्थितीत तालिबान्यांची कोणतीही तमा न बाळगता झाकिया (Zakia Khudadadi ) हिने स्पर्धेत भाग घेण्याचा धाडसी निर्णय घेतलाय.

Afghan athletes
Olympic : जिंकलो नसलो तरी पुन्हा जिंकण्यासाठीच खेळणार

2004 मधील अँथेन्स पॅरालिंपिक स्पर्धेनंतर अफगाणिस्तानचे प्रतिनिधीत्व करणारी झाकिया (Zakia Khudadadi) ही पहिली अ‍ॅथलिट आहे. ती गुरुवारी तायकोंदो क्रीडा प्रकारात खेळताना दिसेल. महिलांच्या 44-49 किलो वजनी गटात ती देशाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. दुसरीकडे तिच्यासोबत टोकियोत पोहचलेला हुसेन रासोली शुक्रवारी पुरुष गटातील 400 मीटर टी 47 स्पर्धेत भाग घेणार आहेत.

Afghan athletes
Paralympics: PM मोदींनी चंदेरी गर्लला कॉल करुन दिल्या शुभेच्छा!

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत रविवारी भारताला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. भारतीय टेबल टेनिस स्टार भाविना पटेल हिच्याकडून सुवर्ण पदकाची आस होती. पण फायनलमध्ये तिला चिनी खेळाडूने पराभूत केले. तिने मिळवलेले रौप्य पदकाने स्पर्धेत भारताचे खाते उघडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.