Paralympic 2024: पॅरिसमध्ये इतिहास घडवणाऱ्या भारतीय खेळाडूंचे जोरदार स्वागत; जल्लोष पाहून पदकविजेते भारावले

Indian athletes won 27 medals in paris Paralympic 2024: भारताने पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये आजवरच्या पॅरालिम्पिक इतिहासामधील सर्वाधिक पदके जिंकली आहेत.
Paris Paralympic
Paris Paralympicesakal
Updated on

Paris Paralympic 2024: पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताकडून एकूण ८४ खेळाडू सहभागी झाले होते. २८ ऑगस्टपासून सुरू झालेली पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा ८ सप्टेंबर रोजी समाप्त होईल.

परंतु तत्पुर्वी पदकविजेत्यांसह काही खेळाडू भारतात परतले आहेत. इतिहास घडवणाऱ्या या पॅरा खेळाडूंचे दिल्ली एअरपोर्टवर चाहत्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

Paris Paralympic
Paralympic Games Paris 2024 : महाराष्ट्राचा दिलीप गावित अंतिम फेरीत; पॅरालिंपिकमधील ४०० मी. धावण्याच्या शर्यतीत यश

पॅरालिम्पिक स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात भारताने सर्वाधिक पदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताने ६ सप्टेंबरपर्यंत एकूण २७ पदकं जिंकली. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने १९ पदके जिंकले होते. पण हा विक्रम यंदा मोडीत काढला आहे.

भारताच्या या २७ पदकांमध्ये ६ सुवर्ण, ९ रौप्य व १२ कांस्य पदकांचा समावेश आहे. या २७ पदकांसह भारत पदतालिकेत १७ व्या क्रमांकावर आहे. पदकतालिकेत चीन (१८८ पदके) पहिल्या, ग्रेट ब्रिटन (१०० पदके) दुसऱ्या आणि अमेरिका (८६ पदके) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Paris Paralympic
US Open 2024 : पेगुला-सबलेंकामध्ये अजिंक्यपदाची लढत; मुचोवा, नवारोचे आव्हान संपुष्टात

चाहत्यांच्या प्रेमाने भारावले खेळाडू

चाहत्यांच्या स्वागताने आणि प्रेमाने भारावून गेलेल्या पदकविजेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भारताची गोल्डन गर्ल नेमबाज अवनी लेखरा म्हणाली, " हा प्रवास खूप सुंदर होता आपण या पॅरालिम्पिक स्पर्धेत आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत सर्वाधिक पदके जिंकलो आहोत."

कांस्यपदक विजेती पॅरा नेमबाज मोना अगरवाल म्हणाली, " स्वागत खूप सुंदर होते आणि माझा हा पहिलाच पॅरालिम्पिक प्रवास आनंददायी होता."

तर कांस्यविजेते पॅरा तिरंदाज राकेश कुमार आपल्या प्रशिक्षकांना श्रेय देत म्हणाला, "स्वागताबद्दल खूप छान वाटतंय, माझ्या या यशाचे श्रेय माझ्या प्रशिक्षकांना जाते. आम्ही आणखी मेहनत करून पुढील स्पर्धेत आणखी चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.