Paris Olympic Deepika Kumari Archery : शूटऑफमध्ये रोमहर्षक विजय! दीपिका कुमारीचे पाऊल पडते पुढे...

Deepika Kumari Archery News : महिला सांघिक विभागात अपयशी ठरलेल्या दीपिकाकुमारी हिने वैयक्तिक प्रकारात शानदार कामगिरी केली. तिने पॅरिस ऑलिंपिकमध्ये बुधवारी झालेल्या सलग दोन लढतींमध्ये विजय साकारत पुढल्या फेरीत प्रवेश केला.
Paris 2024 Olympics archery Deepika Kumari
Paris 2024 Olympics archery Deepika Kumarisakal
Updated on

Paris Olympic Deepika Kumari Archery : महिला सांघिक विभागात अपयशी ठरलेल्या दीपिकाकुमारी हिने वैयक्तिक प्रकारात शानदार कामगिरी केली. तिने पॅरिस ऑलिंपिकमध्ये बुधवारी झालेल्या सलग दोन लढतींमध्ये विजय साकारत पुढल्या फेरीत प्रवेश केला. आता उपउपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर जर्मनीच्या मिशेल क्रोपेन हिचे आव्हान असणार आहे. येत्या ३ ऑगस्ट रोजी ही लढत रंगणार आहे.

Paris 2024 Olympics archery Deepika Kumari
Paris Olympic 2024, Day 5: भारतीय नारी लैय भारी! मराठमोळ्या स्वप्नीलनेही दिली मेडलची आशा, जाणून घ्या दिवसभरात काय घडलं

दीपिकाकुमारी हिला पहिल्या लढतीत कडव्या संघर्षानंतर विजय साकारता आला. यामध्ये तिला इस्तोनियाच्या रीना परनात हिचा सामना करावा लागला. पहिला सेट २९-२८ असा जिंकत दीपिकाने दोन गुण कमवले; पण दुसऱ्या सेटमध्ये रीना हिने २७-२६ असे यश मिळवताना बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये दोघींना २७ गुणांची कमाई करता आली. त्यामुळे या सेटमध्ये दोघींना प्रत्येकी एक गुण कमवता आला. त्यामुळे दोघींची संख्या ३-३ अशी झाली.

Paris 2024 Olympics archery Deepika Kumari
Paris Olympic 2024, Day 6: भारताला नेमबाजीत तिसरं मेडल मिळणार? लक्ष्य सेन अन् प्रणॉय एकमेकांविरुद्धच लढणार; पाहा आजचं वेळापत्रक

चौथ्या सेटमध्ये रीना हिने २७-२४ असा विजय साकारत आपली गुणसंख्या पाचवर नेली. पाचव्या सेटमध्ये दीपिकाला विजयाची गरज होती. तिने अचूक निशाणा साधला. तिने सोडलेल्या तीनही बाणांनी दहाचा लक्ष्यभेद केला. त्यामुळे तिला ३० गुणांची कमाई करता आली. रीना हिला २७ गुणांवरच समाधान मानावे लागले. अखेर दोन खेळाडूंमध्ये ५-५ अशी बरोबरी साधली. त्यामुळे निकाल लागण्यासाठी शूटऑफचा अवलंब करावा लागला.

Paris 2024 Olympics archery Deepika Kumari
Paris Olympic 2024: महाराष्ट्राच्या लेकाची शान! स्वप्नील कुसळे अचूक 'लक्ष्य' भेदून फायनलमध्ये, पदकासाठी खेळणार

शूटऑफमध्ये रोमहर्षक विजय

दीपिकाकुमारी हिने शूटऑफमध्ये रोमहर्षक विजय साकारला. तिने सोडलेल्या बाणामुळे नऊ गुणांची कमाई करता आली. रीना परनात हिने आठ गुणांची कमाई केली. अखेर भारताच्या कन्येने या लढतीत ६-५ असा विजय संपादन करीत पुढे पाऊल टाकले. दीपिकाने पुढील फेरीत नेदरलँड्‌सच्या क्विंटी रोएफिन हिच्यावर ६-२ अशी मात केली. दीपिकाने तीन सेट जिंकून एकूण सहा गुणांची कमाई केली. क्विंटी हिला एका सेटमध्ये विजय मिळवता आला. त्यामुळे दोन गुणांवरच समाधान मानावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.