Paris 2024 Paralympics Opening Ceremony LIVE: पॅरालिम्पिकचा उद्घाटन सोहळा शानदार, नयनरम्य! भारतीय खेळाडूंनी वेधले लक्ष

Paralympics 2024 Opening Ceremony Indian squad: पॅरालिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 'सिटी ऑफ लाईट' मधील प्लेस डे ला कॉन्कॉर्ड आणि चॅम्प्स-एलिसीज येथे पार पडला.
Paris Paralympic 2024
Paris Paralympic 2024esakal
Updated on

Paris 2024 Paralympics Opening Ceremony LIVE:

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आयफेल टॉवर आणि ट्रोकाडेरो पॅलेससह तरंगत्या 'परेड ऑफ नेशन्स'चे यजमानपद भूषवणाऱ्या सीन नदीच्या काठी पार पडला होता. आजपासून सुरू होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 'सिटी ऑफ लाईट' मधील प्लेस डे ला कॉन्कॉर्ड आणि चॅम्प्स-एलिसीज येथे पार पडला. परंपरेला फाटा देत ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धेचा हा सोहळा प्रथमच स्टेडियमच्या बाहेर रंगला.

पॅरिस पॅरालिंपिकच्या उद्‌घाटन सोहळ्यासाठी भारताकडून सुमीत अंतिल व भाग्यश्री जाधव यांची ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताचे ८४ खेळाडू सहभाग घेणार आहेत आणि ही भारताची आतापर्यंतची सर्वात मोठी तुकडी आहे. भालाफेकपटू अंतिलने तीन वर्षांपूर्वी टोकियोमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. भारताचे ८४ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यामध्ये ३२ महिला खेळाडूंचा समावेश आहे. भारताचे खेळाडू वेगवेगळ्या १२ खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. यातील सर्वाधिक ३८ खेळाडू ऍथलेटिक्समध्ये सहभागी होणार आहेत

Paris Paralympic 2024
Paris Paralympic 2024: ८४ खेळाडू, १२ खेळ... कसं असणार भारताचे वेळापत्रक? जाणून घ्या एका क्लिकवर

भारताने एकूण १२ पॅरालिम्पिक स्पर्धेत नऊ सुवर्ण, १२ रौप्य आणि १० कांस्यपदकांसह ३१ पदके जिंकली आहेत. मुरलीकांत पेटकर हे पॅरालिम्पिक पदक जिंकणारे पहिले भारतीय होते. त्यांनी हेडलबर्ग १९७२ मध्ये सुवर्ण जिंकले होते. देवेंद्र झाझरिया हा पॅरालिम्पिकमध्ये अनेक सुवर्णपदके जिंकणारा एकमेव भारतीय आहे.

Paris Paralympic 2024
Paralympic 2024: ९ व्या वर्षी पाय गमावला, आईनं भाजी विकून वाढवलं; आता मरिय्यपन भारतासाठी तिसरं पदक जिंकण्यासाठी उतरणार मैदानात

पॅरिसमध्ये जगभरातील ४४०० खेळाडू पदक जिंकण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसतील. ११ दिवस रंगणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये २२ खेळांमध्ये एकूण ५४९ पदकांसाठी झुंज लागेल. भारताचे १००पेक्षा अधिक जणांचे पथक सोहळ्यात दिसणार आहे. शीतल देवी (तिरंदाज), हरविंदर सिंग (तिरंदाज), होकातो सेमा (गोळाफेकपटू), नारायणा कोंगनापाल्ले (रोवर), मनीष नरवाल (नेमबाज), कृष्णा नागर (बॅडमिंटनपटू), सुहास यथिराज (बॅडमिंटनपटू), भाविना पटेल (टेबलटेनिस) यांच्याकडून भारतीयांना पदकाच्या अपेक्षा आहेत.

Paris Paralympic 2024
Paris Paralympic 2024esakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.