Paralympic 2024 Gold Medal : पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात सहावे सुवर्णपदक जमा झाले. उत्तर प्रदेशच्या प्रवीण कुमारने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला एकूण २६ वे पदक मिळवून दिले. त्याने शुक्रवारी पुरुषांच्या उंच उडी T64 स्पर्धेत २.०८ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह सुवर्णपदक जिंकले. यासह त्याने आशियाई विक्रमही मोडीत काढला.
प्रवीण कुमारचे हे दुसरे पॅरालिम्पिक पदक आहे. टोकियो २०२० मध्ये त्याने उंच उडी T64 स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. अलीकडेच आशियाई पॅरा गेम्समध्येही त्याने सुवर्णपदक पटकावले होते. अमेरिकेच्या डेरेक लॉकिडेंटला रौप्य, तर उझबेकिस्तानच्या गियाजोव्ह तेमुर्बेक व पोलंडच्या मॅसीएज लेपिटो यांना संयुक्तपणे कांस्यपदक दिले गेले.
अवनी लेखरा ( नेमबाजी) R2 10m एअर रायफल स्टँडिंग SH1
नितेश कुमार ( बॅडमिंटन) पुरुष एकेरी SL3
सुमित अंतिल ( भालाफेक F64)
हरविंदर सिंग ( तिरंदाजी) वैयक्तिक रिकर्व खुला गट
धरमबीर ( पुरुष क्लब थ्रो F5
प्रवीण कुमार ( उंच उडी T64)