Paris Paralympic 2024: तब्बल ५५ पदकं ! पॅरालिम्पिकमधील यशस्वी जलपरी; तिचा विक्रम मोडणे जवळपास अशक्य

American Trischa Zorn-Hudson: पॅरालिम्पिक मधील सर्वात यशस्वी ॲथलिट त्रिशा झॉर्न-हडसन ही आहे आहे.
Trischa Zorn-Hudson
Trischa Zorn-Hudsonesakal
Updated on

AthleteTrischa Zorn-Hudson who : पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. पण, या स्पर्धेच्या इतिहासातील अमेरिकेची जलतरपटू त्रिशा झॉर्न-हडसन ही सर्वात यशस्वी ॲथलिट आहे. अमेरिकन पॅरा-स्विमर झॉर्न-हडसनने पॅरालिम्पिकमध्ये वैयक्तिक ३२ सुवर्ण पदके, ९ रौप्य पदके आणि ५ कांस्यसह एकूण ४६ पदकं जिंकली आहेत. यात तिच्या सांघिक पदकांची संख्या जोडल्यात ही आकडेवारी ५५ इतकी होते.

कोण आहे त्रिशा झॉर्न-हडसन ?

झॉर्न-हडसनचा जन्म कॅलिफोर्निया येथे झाला. लहानपणापासूनच तिला आनुवांशिक डोळ्यांच्या आजाराने ग्रासले होते आणि ज्यामुळे ती अंध झाली. पण तिने अपंगत्वाला कमजोरी न समजता आपले सामर्थ्य बनवले आणि पॅरालिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम करून दाखविला.

Trischa Zorn-Hudson
India at Paralympics 2024 Live: भारताला मोठा धक्का; Manasi Joshi पहिल्याच सामन्यात पराभूत

त्रिशाची कारकीर्द

त्रिशाने वयाच्या १६ व्या वर्षी १९८० मध्ये अर्न्हेम इथे झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये पहिल्यांदा भाग घेतला आणि सात सुवर्णपदके जिंकली होती. तिचा जलतरण कारकिर्दीचा कालावधी १९८० ते २००४ इतका आहे. ज्या दरम्यान तिने सात पॅरालिम्पिक खेळांमध्ये भाग घेतला आहे. बार्सिलोना येथे १९९२ च्या पॅरालिम्पिक गेम्समध्ये तिने १० सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांसह वैयक्तिक पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. २००० मधील सिडनी गेम्सनंतर तिने तिच्या अपंगत्व प्रकारात आठ जागतिक विक्रमही केले आहेत.

तिला २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक हॉल ऑफ फेम आणि यू.एस. ऑलिम्पिक , पॅरालिम्पिक हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

Trischa Zorn-Hudson
Kavita Raut: आदिवासी असल्याने अन्याय... राज्य सरकार नोकरी देत नाही; आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतचा गंभीर आरोप

पॅरालिम्पिक खेळांची १७ वी आवृत्ती पॅरिसमध्ये २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये जगभरातील ४,००० हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये ८४ भारतीय ॲथलिट्स सहभागी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.