Ramita Jindal Paris Olympic 2024 : 'गोल्ड मेडल'पासुन रमिता जिंदल एक पाऊल दूर! १० मीटर एअर रायफल स्पर्धेत फायनलमध्ये मारली एन्ट्री

Ramita Jindal Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या दुसऱ्या दिवशी (२८ जुलै) शूटिंगमध्ये भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
Ramita Jindal Paris Olympic 2024
Ramita Jindal Paris Olympic 2024sakal
Updated on

Ramita Jindal Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या दुसऱ्या दिवशी (२८ जुलै) शूटिंगमध्ये भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रमिता जिंदलने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. रमिता गेल्या 20 वर्षांत मनू भाकरनंतरची दुसरी महिला नेमबाज ठरली. तर रमिता तिच्या प्रशिक्षक सुमा शिरूर (अथेन्स 2004) नंतर ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला रायफल नेमबाज आहे.

Ramita Jindal Paris Olympic 2024
PV Sindhu : जगात भारी आपली पीव्ही सिंधू! मेडलच्या दिशेने पहिले पाऊल; Paris Olympicsमध्ये केली धमाकेदार सुरुवात

60 शॉट्सच्या पात्रता फेरीत रमिता एकूण 631.5 गुणांसह पाचव्या स्थानावर राहिली. रमिताने पहिल्या मालिकेत 104.3, दुसऱ्यामध्ये 106.0, तिसऱ्यामध्ये 104.9, चौथ्यामध्ये 105.3, पाचव्यामध्ये 105.3 आणि सहाव्या मालिकेत 105.7 गुण मिळवले. या स्पर्धेचा अंतिम सामना उद्या (29 जुलै) होणार आहे.

Ramita Jindal Paris Olympic 2024
IND vs SL : गौतम गंभीर घेणार मोठा निर्णय; पहिल्या टी-20 मधील हिरो, दुसऱ्या सामन्यातून होणार बाहेर?

एलाव्हेलिन वालारिवन देखील महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भाग घेत होता, परंतु तिने निराश केले. वालारिवन 630.7 गुणांसह 10व्या स्थानावर आहे. वलारिवनची एकवेळ अंतिम फेरी गाठण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असली तरी शेवटच्या काही शॉट्समध्ये तिला आपला वेग कायम ठेवता आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.