Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक पदकात असणार आयफेल टॉवरच्या लोखंडाचा तुकडा

Paris Olympics 2024 Medal Design : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देण्यात येणारी पदके ही षटकोणी आकाराची आहेत.
Paris Olympics 2024 Medal Design
Paris Olympics 2024 Medal Design esakal
Updated on

Paris Olympics 2024 Medal Design : जुलै महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत देण्यात येणाऱ्या पदकांच्या डिझाईनचे अनावरण आज करण्यात आलं. या स्पर्धे देण्यात येणारी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी मिळून 5,084 पदकांमध्ये प्रसिद्ध आयफेल टॉवरच्या लोखंडाचा अंश वापरण्यात येणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकांच्या मधोमध हा लोखंडाचा तुकडा बसवण्यात येणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देण्यात येणारी पदके ही षटकोणी आकाराची आहे. त्याचे डिझाईन हे एखाद्या जेमस्टोनसारखं आहे. हे डिजाईन प्रसिद्ध फ्रेंच ज्वेलरी हाऊस चाऊमेंट यांनी तयार केलं आहे.

Paris Olympics 2024 Medal Design
U19 World Cup 2024 : पाकिस्तानचं काही खरं नाही; सेमी फायनलमध्ये दोन भारतीयांच कडवं आव्हान

पॅरिस ऑलिम्पिकच्या स्थानिक आयोजन समितीचे प्रमुख टोनी एस्टांग्वेट यांनी सांगितलं की, 'आम्ही पॅरिस ऑलिम्पिक आणि पारा ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंना आयफेल टॉवरचा एक तुकडा देणार आहोत.'

ते पुढे म्हणाले की, 'यावेळीच्या ऑलिम्पिक पदके ही मौल्यवान सुवर्ण, रौप्य आणि कास्य धातू आणि आमच्या देशाचा मौल्यवान धातू आयफेल टॉवरवरील लोखंडाच्या तुकड्याचे मिश्रण असणार आहे.'

Paris Olympics 2024 Medal Design
U19 World Cup 2024 : पाकिस्तानचं काही खरं नाही; सेमी फायनलमध्ये दोन भारतीयांच कडवं आव्हान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.