Avani Lekhara and Mona Agarwal Won Medal at Paris Paralympic 2024: पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धा सध्या सुरू असून शुक्रवारी (३० ऑगस्ट) भारताच्या खात्यात पहिलं पदक आलं. भारताच्या अवनी लेखरा हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टॅन्डिंग SH1 प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली. याच प्रकारात भारताच्या मोना अगरवालने कांस्य पदक जिंकलं.
अवनीचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. तिने टोकियोमध्ये झालेल्या पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे ती पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदक जिंकणारी पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये देखील कांस्य पदक जिंकले होते. तिने आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्ण पदक जिंकले होते.
अवनीने शुक्रवारी झालेल्या अंतिम फेरीत सुरुवातीपासूनच चांगली वय पकडली होती. तिने २४९.७ पाँइंट्स मिळवत सुवर्ण पदक जिंकले. तसेच रौप्य पदक जिंकलेल्या कोरियाच्या युन्री ली हिने २४६.८ पाइँट्स मिळवले. तसेच मोनाने २२८.७ पाँइंट्स मिळवले.