Sheetal Devi lost in Pre Quarterfinal: पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत आत्तापर्यंत भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली राहिली आहे. भारताकडून नेमबाजांनी तर चमकदार कामगिरी केली. शनिवारी भारताला १७ वर्षीय तिरंदाज शितल देवी हिच्याकडूनही मोठ्या अपेक्षा होत्या. ती पॅरालिम्पिकमध्ये महिला वैयक्तिक कंपाऊंड ओपन प्रकारात सहभागी झाली होती.
दोन्ही हात नसल्याने पायाने तिरंदाजी करणाऱ्या खूप कमी तिरंदाजांपैकी एक असलेल्या शितलने आत्तापर्यंत अनेकदा अफलातून कामगिरी करत विजेतीपदं मिळवली आहेत. ती पॅरा तिरंदाजीमधील अव्वल खेळाडूंपैकी एक आहे. मात्र, शनिवारी तिला अगदी रोमांचक झालेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.