India at Paris Paralympic 2024: पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतासाठी शुक्रवारचा दिवस खास ठरला. भारताच्या खात्यात शुक्रवारी चार पदकं आली. त्यातही नेमबाजांनी हा दिवस गाजवला.
नेमबाज अवनी लेखराने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलं. तिने १० मीटर एअर रायफल स्टॅन्डिंग SH1 प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. हे तिचं पॅरालिम्पिकमधील दुसरं सुवर्णपदक ठरलं. तिने टोकियो पॅरालिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकले होते.
याशिवाय तिच्याच क्रीडा प्रकारात मोना अगरवाल हिनेही कांस्य पदकाला गवसणी घातली. त्यांच्या यशानंतर पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल SH1 प्रकारात मनीष नरवालने रौप्य पदक पटकावलं. त्यामुळे एकाच दिवसात भारताला नेमबाजीतून तीन पदके मिळाली.
इतकंच नाही तर महिलांच्या T35 १०० मीटर प्रकारात प्रीती पालने कांस्य पदक जिंकले. ती ऍथलेटिक्सच्या ट्रॅक प्रकारात पदक जिंकणारी भारताची पहिलीच खेळाडू ठरली.
दरम्यान, या चारही खेळाडूंचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी अत्यंत जिद्दीनं खेळ करत अडथळे पार करत हा टप्पा गाठला. त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ