Paris Paralympics 2024 Medal Tally : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अविश्वसनीय कामगिरी होताना दिसतेय. शुक्रवारी प्रवीण कुमार (T44) याने पुरुषांच्या उंच उडी-T64 स्पर्धेत आशियाई विक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले. २१ वर्षीय प्रवीणने २.०८ मीटरच्या सर्वोत्तम उडीसह सुवर्णपदक जिंकले. नंतर मध्यरात्री नागालँडच्या होकातो होतोझे सेमाने गोळाफेक F57 प्रकारात कांस्यपदक जिंकले. होकातो हे माजी सैनिक आहेत आणि त्यांना भूसुरुंग स्फोटात पाय गमवावा लागला होता. १७ वर्षांचे असताना ते भारतीय सैन्यात दाखल झाले होते. त्यांनी एलिट स्पेशल फोर्समध्ये सामील होण्याचे स्वप्न पाहिले होते, परंतु दुर्दैवाने, २००२ मध्ये LOC येथे काउंटर घुसखोरी ऑपरेशन दरम्यान भूसुरुंगाच्या स्फोटामुळे त्यांना पाय गमवावे लागले.
प्रवीणच्या सुवर्णपदक आणि होकातोच्या कांस्यपदामुळे भारताच्या पदकांची संख्या २७ झाली आहे. भारताने ६ सुवर्ण, ९ रौप्य आणि १२ कांस्यसह एकूण २७ पदके जिंकली आहेत. त्यामुळे सध्या भारत पदकतालिकेत १४व्या क्रमांकावर आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
पुरुष गोळाफेक F57 Final मध्ये सोमण राणा ( मेघालया) आणि होकातो होतोझे सेमा गालँड) या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर नजर होती. दोघंही भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. २००० च्या मध्यात त्यांनी भूसुरुंग स्फोटात एक पाय गमावला आणि शारीरिक व मानसिक आघातातून बाहेर पडण्यासाठी त्यांना बरीच वर्ष लागली. २०१७ च्या सुमारास आर्मी स्पोर्ट्स नोडने त्या दोघांना पॅरा-स्पोर्ट खेळण्यासाठी पटवून दिले. सोमण टोकियोत चौथ्या क्रमांकावर राहिले होते.
सोमण राणा यांनी १४.०७ मीटर या सर्वोत्तम वैयक्तिक सुरुवातीला अव्वल तीनमध्ये होता, परंतु इराणच्या यासिन खोस्रावी व ब्राझिलच्या थिएगो पॉलिनो यांनी अनुक्रमे १५.९६ ( पॅरालिम्पिक ) व १५.०६ मीटर लांब गोळा फेकून सुवर्ण व रौप्य पदकावर दावा सांगितला होता. भारताचा होकातोने अचंबित कामगिरी केली. त्याने त्याच्या चौथ्या प्रयत्नात १४.६४ मीटर लांब गोळा फेकून थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. यासिन व पॉलिनो अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाचे मानकरी ठरले.
दरम्यान, भावनाबेन चौधरीने महिलांच्या भालाफेक F46 प्रकारात ३९.७० मीटरसह तीन वेळा स्वतःचा वैयक्तिक विक्रम मोडला, परंतु तिला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.