Record Breaking: पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारतानं जिंकली विक्रमी पदकं; Medal Tallyत गरुडझेप!

India at Paralympic 2024 Medal Table: टोकियो २०२० मध्ये भारताने ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्यसह एकूण १९ पदकं जिंकली होती. पॅरा ॲथलीट मुरलीकांत पेटकर यांनी १९७२ मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले.
Paralympic Table
Paralympic Table esakal
Updated on

Paris Paralympics 2024 Medal Tally : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अविश्वसनीय कामगिरी होताना दिसतेय. शुक्रवारी प्रवीण कुमार (T44) याने पुरुषांच्या उंच उडी-T64 स्पर्धेत आशियाई विक्रम मोडून सुवर्णपदक जिंकले. पॅरिसमधील हे भारताचे सहावे सुवर्ण ठरले आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत प्रथमच भारताने सहा सुवर्णपदके जिंकली आहेत. यापूर्वी टोकियोमध्ये भारताने ५ सुवर्णपदके जिंकली होती.

२१ वर्षीय प्रवीणने २.०८ मीटरच्या सर्वोत्तम उडीसह सुवर्णपदक जिंकले. लहान पायांनी जन्मलेला प्रवीण नोएडाचा रहिवासी आहे. प्रवीण कुमारच्या सुवर्णपदकासह पॅरालिम्पिक २०२४ मधील भारताच्या पदकांची संख्या २६ झाली आह. भारताने ६ सुवर्ण, ९ रौप्य आणि ११ कांस्यसह एकूण २६ पदके जिंकली आहेत. त्यामुळे सध्या भारत पदकतालिकेत १४व्या क्रमांकावर आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

पॅरालिम्पिक २०२४ मधील भारताच्या पदक विजेत्यांची नावं

  1. अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)

  2. नितीश कुमार (बॅडमिंटन) – सुवर्णपदक, पुरुष एकेरी (SL3)

  3. सुमित अँटील (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक (F64 श्रेणी)

  4. हरविंदर सिंग (तिरंदाजी) – सुवर्ण पदक, पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह ओपन

  5. धरमबीर (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुषांचा क्लब थ्रो (F51)

  6. प्रवीण कुमार (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष उंच उडी (T44)

  1. शरद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T63)

  2. अजित सिंग (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष भालाफेक (F46)

  3. सचिन सर्जेराव खिलारी (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष गोळाफेक (F46)

  4. प्रणव सुरमा (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष क्लब थ्रो (F51)

  5. तुलसीमाथी मुरुगेसन (बॅडमिंटन) – रौप्य पदक, महिला एकेरी (SU5)

  6. सुहास एल यथीराज (बॅडमिंटन) – रौप्य पदक, पुरुष एकेरी (SL4)

  7. निषाद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T47)

  8. योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष थाळी फेक (F56)

  9. मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)

  1. रुबिना फ्रान्सिस (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)

  2. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 200 मीटर शर्यत (T35)

  3. मनीषा रामदास (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SU5)

  4. शीतल देवी-राकेश कुमार (तिरंदाजी) – कांस्य पदक, मिश्र कंपाऊंड ओपन

  5. नित्या श्री सिवन (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SH6)

  6. दीप्ती जीवनजी (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला 400 मीटर (T20)

  7. मरियप्पन थांगावेलू (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुष उंच उडी (T63)

  8. सुंदरसिंग गुर्जर (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, पुरुष भालाफेक (F46)

  9. कपिल परमार (जुडो) – कांस्य पदक, पुरुष ६० किलो (J1)

  10. मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)

  11. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत (T35)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.