Paris Paralympic 2024: भारतासाठी आनंद अन् निराशाही! यथिराज आपल्याच देशाच्या सुकांत कदमला पराभूत करत सुवर्णपदकासाठी खेळणार

Suhas Yathiraj - Sukant Kadam: पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनध्ये यथिराज सुवर्णपदकासाठी खेळणार आहे. पण त्याला यासाठी उपांत्य फेरीत भारताच्याच सुकांत कदमला पराभूत करावं लागलं.
Suhas Yathiraj - Sukant Kadam | Paris Paralympic
Suhas Yathiraj - Sukant Kadam | Paris ParalympicSakal
Updated on

India at Paris Paralympic 2024: पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये भारताचे खेळाडू कमाल करत आहेत. रविवारचा दिवसही भारताच्या बॅडमिंटनपटूंनी गाजवला. भारताच्या सुहास यथिराज आणि सुकांत कदम यांच्यात पुरुष एकेरीत SL4 प्रकारात उपांत्य सामना झाला.

या सामन्यात अव्वल मानांकित सुहास यथिराजने २१-१७, २१-१२ अशा फराकाने सरळ गेममध्ये सुकांत कदमला पराभूत केलं.

त्यामुळे सुहास यथिराज अंतिम सामन्यात पोहचला असून आता तो सुवर्णपदकासाठी सामना खेळेल, तर सुकांत कदमला आता कांस्य पदक जिंकण्याची संधी असणार आहे.

Suhas Yathiraj - Sukant Kadam | Paris Paralympic
Paris Paralympic 2024 : अवनी लेखराचा ऐतिहासिक लक्ष्यभेद; टोकियोनंतर पॅरिस पॅरालिंपिकमध्येही सुवर्णपदकावर मोहोर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.