India at Paralympic 2024: Yogesh Kathuniya ने जिंकलं रौप्यपदक; पायातील त्राण गमावूनही तो नाही खचला अन्...

Yogesh Kathuniya won medal in Paris : कथुनियाचे वडील हे भारतीय सैन्यात होते. वयाच्या ९ व्या वर्षी योगेशला Guillain–Barré syndrome ( यामध्ये तुमच्या स्नायूंची वाढ खुंटते) आजार झाला. त्याच्या आईने फिजिओथेरपी शिकली आणि ३ वर्षांच्या आत त्याला पुन्हा स्नायूंची ताकद मिळवून दिली.
Yogesh Kathuniya
Yogesh Kathuniyaesakal
Updated on

Paris Paralympic 2024 Yogesh Kathuniya : पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या पदकाची संख्या ८ झाली आहे. १ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्य अशा पदकांमध्ये आणखी एक पदक जमा झाले आहे. बहादूरगडच्या योगेश कथुनियाने पुरुषांच्या F56 थाळीफेक प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली.

थाळी फेकी फायनलमध्ये काय घडलं?

स्लोव्हाकियाच्या ड्युसान लॅक्झोने पहिल्या प्रयत्नात ४१.२० मीटर लांब थाळी फेकली आणि सहा प्रयत्नानंतरही हा प्रयत्न सर्वोत्तम राहिला. पुरुषांच्या F56 थाळीफेकील ४८.३४ मीटरचा वर्ल्ड रेकॉर्ड योगेशच्या नावावर आहे. रिओ आणि टोकियोतील सुवर्णपदक विजेता क्लाऊडीन बतीस्टा हा त्यानंतर थाळी फेक करण्यासाठी आला. तीनवेळच्या जागतिक विजेत्या क्लाऊडीनने त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात ४६.४५ मीटर लांब थाळीफेकली आणि तो पहिल्या क्रमांकावर गेला. त्याने स्वतःचाच पॅरालिम्पिक विक्रम मोडला.

४५ वर्षीय बतीस्टाने २०१२ च्या लंडन पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेकीत रौप्यपदक जिंकले होते. त्याने आज त्याच्या पाचव्या प्रयत्नात ४६.८६ मीटर थाळी फेकून भारतीय खेळाडूसमोर तगडे आव्हान उभे केले. योगेशने त्याच्या पहिल्या प्रयत्नात ४२.२२ मीटर लांब थाळी फेकली आणि ही त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. पण, त्याला या पुढे मजल मारता न आल्याने सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर जावे लागले. ग्रीसच्या Konstantinos Tzounis ने ४१.३२ मीटरसह कांस्यपदक पक्के केले.

Yogesh Kathuniya
Yogesh Kathuniyaesakal

योगेश कथुनियाचा प्रवास...

योगेश कथुनियाचा जन्म ३ मार्च १९९७ सालचा... त्याने २०२० च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या डिस्कस थ्रो F56 स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. कथुनियाचे वडील हे भारतीय सैन्यात होते. वयाच्या ९ व्या वर्षी योगेशला Guillain–Barré syndrome ( यामध्ये तुमच्या स्नायूंची वाढ खुंटते) आजार झाला. त्याच्या आईने फिजिओथेरपी शिकली आणि ३ वर्षांच्या आत त्याला पुन्हा स्नायूंची ताकद मिळवून दिली.

२०१०६ मध्ये योगेशने पॅरा स्पोर्ट्स खेळण्यास सुरुवात केली. त्याने बर्लिन येथे २०१८ च्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये ४५.१८ मीटरवर थाळी फेकून F36 प्रकारात वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. २०२० च्या पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदकासाठी त्याला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. योगेशने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत २०२३ व २०२४ मध्ये रौप्य आणि २०१९ मध्ये कांस्यपदक जिंकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.