पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत शनिवारी भारतीय खेळाडूंनी विक्रमी कामगिरीत भर घातली. भारताला पुरुषांच्या भालाफेकीच्या F41 गटात नवदीप सिंगने ( Navdeep Singh ) सुवर्णपदक जिंकून दिले. त्यापाठोपाठ Simran Sharma ने महिलांच्या २०० मीटर T12 गटात कांस्यपदकाची कमाई केली. पुरुषांच्या 400m T47 Final मध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील दिलीप महादू गावित याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. त्याने बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर दिली, परंतु जवळजवळ ४ सेकंदाच्या फरकाने त्याला वर्ल्ड रेकॉर्डला मुकावे लागले.
पेठ तालुक्यातील तोरणडोंगरीच्या दिलीप गावितने उजवा हात नसतानाही जिद्द सोडली नाही. गावित कुटुंब शेती करतात. वडील महादू व आई मोहनाबाई यांच्यासोबतीला भास्कर, आनंदा व चिंतामण ही मुले देखील आहेत. बालपणीच डावा हात गमावलेल्या दिलीपने खेळाकडे लक्ष दिले. खेळाविषयी त्याची निष्ठा आणि परीश्रम बघून परळीवैजनाथ येथील प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी त्याला खेळाडू म्हणून दत्तकच घेतले.
नाशिकमधील महात्मा नगर येथे ते त्याच्याकडून नियमितपणे सराव करुन घेतात. २१ वर्षीय दिलीप हा रोहित शर्मा व नीरज चोप्रा यांना आदर्श मानतो. २०२३ च्या आशियाई पॅरा स्पर्धेत नाशिकचा धावपटू दिलीपने ४०० मीटर पुरुष गटात भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते.
दिलीप गावित याने नवव्या लेनमधून पळायला सुरुवात केली आणि ८व्या लेनमध्ये असलेल्या मोरोकोच्या एल हद्दाकी आयमन याला त्याने कडवी टक्कर दिली होती. पण, एका वळणावर दिलीप खूप मागे पडला अन् अन्य स्पर्धक त्याच्या पुढे गेले. एल हद्दाकीने ४६.६५ सेकंदात ४०० मीटर अंतर पार करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. त्याने सुवर्णपदक जिंकले. ( Morocco's Aymane El Haddaoui broke world record ) भारताचा दिलीप ४ सेकंद मागे म्हणजेच ४९.९९ सेकंदाची वेळ नोंदवून आठवा आला. मोरोकोच्या सादनी आयुबला ( ४७.१६ सेकंद) आणि ब्राझिलच्या डी मॉरीस थॉमजला ( ४७.९७ सेकंद) अनुक्रमे रौप्यपदक व कांस्यपदक जिंकता आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.