Paris Paralympic 2024 Schedule: पॅरिसमध्ये काही दिवसांपूर्वीच ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली. आता पॅरिसमध्येच यंदाची पॅरालिम्पिक स्पर्धाही खेळवली जाणार आहे. २८ऑगस्टपासून पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेला सुरुवात होत असून ८ सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.
भारताचे ८४ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यामध्ये ३२ महिला खेळाडूंचा समावेश आहे. यंदा भारतीय खेळाडूंकडून मोठी अपेक्षा आहे. याआधी झालेल्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने ५ सुवर्णपदकांसह एकूण १९ पदके जिंकली होती. आता याहून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा भारतीय खेळाडूंकडून आहे.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे खेळाडू वेगवेगळ्या १२ खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. यातील सर्वाधिक ३८ खेळाडू ऍथलेटिक्समध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान कोणकोणत्या खेळात भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत आणि स्पर्धेत त्यांचे वेळापत्रक कसे आहे, याचा आढावा घेऊ.