Paris paralympic 2024 Medallist: पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताने इतिहास रचला आहे. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेमध्ये ८४ पॅरा खेळाडू भारताकडून सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये भारताने एकूण २९ पदकं जिंकली. पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताने जिंकलेली ही सर्वाधिक पदकं होती. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने १९ पदके जिंकले होते.
भारताच्या या २९ पदकांमध्ये ७ सुवर्ण, ९ रौप्य व १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. या २९ पदकांसह भारत पदकतालिकेत १८ व्या क्रमांकावर आहे. चीन (२२० पदके) पहिल्या, ग्रेट ब्रिटन (१२४ पदके) दुसऱ्या आणि अमेरिका (१०५ पदके) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
अवनी लेखरा (नेमबाजी) आणि सुमित अंतील (भालाफेक) यांसारख्या टोकियो सुवर्णपदक विजेत्यांनी आपले विजेतेपद कायम ठेवले आहे. नितेश कुमार (बॅडमिंटन), नवदीप सिंग (भालाफेक), हरविंदर सिंग (तिरंदाजी), धरमबीर नैन (क्लब थ्रो) ), आणि प्रवीण (उंच उडी) यांनी भारतासाठी प्रथमच पदके जिंकली आहेत.
१३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील खेळाडूंनी भारतासाठी पदके मिळवण्यात योगदान दिले आहे. हरयाणा आठ पदकांसह आघाडीवर आहे, तमिळनाडू चार पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे व राजस्थान आणि उत्तर प्रदेश तीन पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. हरयाणाने सातपैकी चार सुवर्णपदके जिंकून सर्वाधिक योगदान दिले.
हरियाणा (८ पदकं ): मनीष नरवाल, नितेश कुमार, हरविंदर सिंग, सुमित अंतील, धरमबीर नैन, नवदीप सिंग, योगेश कथुनिया, प्रणव सूरमा.
तामिळनाडू ( ४ पदकं ): नित्या श्री सिवान, तुलसीमाथी मुरुगेसन, मनीषा रामदास, मरियप्पन थांगावेलू.
राजस्थान ( ३ पदकं): अवनी लेखरा, मोना अग्रवाल, सुंदर सिंग गुरजर
उत्तर प्रदेश ( ३ पदकं): सिमरन शर्मा, प्रीती पाल, अजित सिंग.
जम्मू आणि काश्मीर ( ३ पदकं): शीतल देवी, राकेश कुमार
मध्य प्रदेश ( २ पदकं ): रुबिना फ्रान्सिस, कपिल परमार
महाराष्ट्र : सचिन खिलारी
हिमाचल प्रदेश: निषाद कुमार
दिल्ली : प्रवीण कुमार
कर्नाटक : सुहास यथीराज
बिहार : शरद कुमार
नागालँड: होकातो सेमा
तेलंगणा: दीप्ती जीवनजी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.