भारताच्या Navdeep Singh चं 'गोल्ड' होऊ शकतं का रद्द? इराणच्या खेळाडूची 'ती' चाल अन् IPC चा निर्णय

Paralympic 2024 Sajdegh Sayah Beit Disqualification : पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील कालची रात्र ही खूप नाट्यमय राहिली. भारतीय भालाफेकपटू नवदीप सिंग याला आधी रौप्यपदक दिले गेले आणि त्यानंतर त्याचे सुवर्णपदकात रुपांतर झाले.
Navdeep Singh
Navdeep Singh esakal
Updated on

India at Paralympics 2024 Navdeep Singh Gold :

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत काल नाट्यमय घडामोडी रंगलेल्या पाहायला मिळाल्या... भारताचा भालाफेकपटू नवदीप सिंग याने ४७.३२ मीटर लांब भाला फेक करून पॅरालिम्पिक विक्रम नावावर केला. यानंतर भालाफेक F41 गटातील सुवर्णपदक आपलेच असे वाटले होते. पण, इराणच्या सजदेह सयाह बैतने ४७.६४ मीटर सर्वोत्तम कामगिरी करून पॅरालिम्पिक रेकॉर्ड मोडला व सुवर्णपदकावरही दावा सांगितला...

Why was Iranian Sadegh Beit Sayah Disqualified?

चित्र स्पष्ट होते, पण सयाहला अपात्र ठरवले गेले. पॅरालिम्पिक विक्रम नोंदवल्यानंतर पॅरालिम्पिक समितीच्या आचारसंहितेचे उल्लंघन करत त्याने काळा ध्वज दाखवला तेव्हा त्याला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. त्यानंतर त्याने गळा चिरण्याची अॅक्शन केली आणि जागतिक ॲथलेटिक्सच्या मते, त्याला 'अयोग्य वर्तन' या कारणावरून स्पर्धेतून बाहेर फेकण्यात आले.

Navdeep Singh
Navdeep Singhesakal

पॅरालिम्पिक वेबसाइटनुसार त्याला आचारसंहितेच्या नियम ८.१ चे उल्लंघन केल्याबद्दल अपात्र ठरवण्यात आले आहे. हा नियम सांगतो की, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स पॅरा ॲथलेटिक्सच्या खेळात सचोटी, नैतिकता आणि आचार यांचे सर्वोच्च मानक राखण्यासाठी वचनबद्ध आहे. क्रीडापटू, प्रशिक्षक, अधिकारी आणि प्रशासकांसह खेळात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, की त्यांनी या मानकांचे पालन केले पाहिजे.

इराणच्या खेळाडूने अपात्रतेच्या निर्णयाविरोधात आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीकडे दाद मागितली होती आणि त्यामुळे पदक वितरण सोहळ्याला उशीर झाला.

Navdeep Singh
Navdeep Singhesakal

सहाय याचे म्हणणे काय होते?

सयाहचे याचिका दाखल केली त्यात त्याने सांगितले की तो ध्वज माझ्या धार्माचे प्रतीक आहे, राजकीय नाही. पण, IPC नियमांनुसार खेळाडू त्यांच्या देशाच्या ध्वजखेरीज इतर कोणताही ध्वज प्रदर्शित करण्यास अनुमती देते नाही. सयाहने असाही दावा केला की त्याने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये अली इब्न अबी तालिबचा ध्वज फडकावला होता, जिथे त्याने रौप्य पदक जिंकले होते, परंतु तेव्हा कारवाई केली गेली नाही. तेव्हा त्यालाल पिवळे कार्ड दाखवले गेले होते आणि अपात्रतेपासून तो वाचला होता.

पण, शेवटी इराणच्या खेळाडूची याचिका IPC ने फेटाळली आणि पुरुषांच्या भालाफेक F41 इव्हेंटचा पदक समारंभ पार पडला. ज्यामध्ये नवदीपला सुवर्णपदक देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.