India at Paralympics 2024: पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची विक्रमी कामगिरी सुरू आहे. शनिवारी भारताला पुरुषांच्या भालाफेकीच्या F41 गटात नवदीप सिंगने ( Navdeep Singh ) आणखी रौप्यपदक जिंकून दिले. त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या २९ झाली आहे. भारताने ६ सुवर्ण, १० रौप्य आणि १३ कांस्यसह एकूण २९ पदके जिंकली आहेत. सध्या भारत पदकतालिकेत १८व्या क्रमांकावर आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
Navdeep in men's javelin throw F41 final २०१७ मध्ये नवदीपने पुरुषांच्या भालाफेक F41 गटात आशियाई युवा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर २०२१च्या जागतिक पॅरा ग्रँड प्रिक्समध्ये सुवर्ण कमाई केली होती. हरयाणाच्या नवदीपला २०२०च्या पॅरालिम्पिक स्पर्धेत F41 प्रकारात चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे तो यंदा तयारीने पॅरिसमध्ये दाखल झाला.
नवदीपचा आज पहिला प्रयत्न फाऊल ठरला, परंतु दुसऱ्या प्रयत्नात त्याने ४६.३९ मीटर लांब भालाफेकला आणि पुढील प्रयत्नात ४७.३२ मीटरसह पॅरालिम्पिक विक्रमाची नोंद केली. चीनच्या सून पेंगिझिआंगचा २०२१मध्ये टोकियोतील ४७.१३ मीटरचा पॅरालिम्पिक विक्रम नवदीपने आज मोडला. इराणच्या सयाह सहेघ बेतने त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात ४६.८४ मीटर अंतर पार करून अव्वल स्थान जिंकले होते, परंतु नवदीपने त्याला मागे टाकले.