पॅरिस : पॅरिस सेंट-जर्मन (Paris Saint-Germain) संघाने मँचेस्टर युनायटेडचा (Manchester United) स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) करारबद्ध करण्याची संधी दवडल्याची माहिती समोर येत आहे. हा नकार रोनाल्डोचा एजंट जॉर्ज मेंडेसने क्लबसमोर प्रस्ताव ठेवल्यानंतर देण्यात आला आहे.
रोनाल्डोने मँचेस्टर युनायडेटकडे त्याला रिलीज करण्यासाठी विनंती केल्याचे वृत्त आले होते. रोनाल्डोला 5 लाख युरोज इतका मोठा आठवड्याचा पगार देणे काही क्लबसाठी शक्य आहे. पीएसजी देखील पैशाकडून कोणाला ऐकत नाही. मात्र सध्या त्यांना लिओनेल मेस्सी, नेमार, केलियन एम्बाप्पे यासारख्या स्टार फुटबॉलरचा मोठा पगार द्यावा लागतो. त्यामुळे अजून एक गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला ते संघात घेणे कठिण आहे.
त्यामुळेच क्लबचे अध्यक्ष नासेर अल खलिफी आणि रोनाल्डोचा एजंट जॉर्ज मेंडीस यांच्यातील बोलणीनंतरही पीएसजीने रोनाल्डोला क्लबमध्ये सामावून घेण्यास नकार दिल्याचे वृत्त आले आहे. दरम्यान, मँचेस्टर युनायटेडचे नवे व्यवस्थापक एरिक टेन हॉग यांनी ख्रिस्तियानो रोनाल्डोला मँचेस्टर युनायटेडमध्येच राहण्यासाठी विनंती केली आहे.
टेन हॉग यांनी 'आम्ही या हंगामासाठी ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी काही रणनिती आखली आहे. मी त्याच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. मी तो क्लब सोडणार आहे असे वृत्तपत्रात वाचले. मात्र मी म्हणतो की ख्रिस्तियानो रोनाल्डो विक्रीसाठी उपलब्ध नाही. तो आमच्या रणनितीचा भाग आहे. आम्ही एकत्रित यशस्वी होण्यास उत्सुक आहोत. हा मुद्दा समोर येण्यापूर्वी मी त्याच्याशी बोललो आहे. माझे त्याच्यासोबतचे संभाषण चांगले झाले आहे. हे संभाषण माझ्यात आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोमध्ये झाले आहे. त्यामुळे मी त्याच्यासोबत चांगले संभाषण झाल्याचे नक्कीच सांगू शकतो.'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.