प्रोव्हीडेन्स : अफगाणिस्तान-युगांडा या दोन देशांमध्ये टी-२० विश्वकरंडकातील क गटातील लढत उद्या पार पडणार आहे. अनुभवाकडे लक्ष देता या लढतीत अफगाणिस्तानचे पारडे जड आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. युगांडाचा संघ टी-२० विश्वकरंडकात पहिल्यांदाच सहभागी होत आहे. अफगाणिस्तानसमोर त्यांचा कस लागू शकतो.
अफगाणिस्तानचा संघ सातव्यांदा टी-२० विश्वकरंडकात सहभागी होत आहे. अफगाणिस्तानच्या संघाने गेल्या काही वर्षांमध्ये प्रगतीच्या दिशेने पावले टाकली आहेत. मागील वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडकात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. अफगाणिस्तानच्या संघाने इंग्लंड, पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांना धूळ चारत आपल्यामध्ये अव्वल दर्जाचा खेळ करण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे साहजिकच यंदाच्या टी-२० विश्वकरंडकात त्यांच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा करता येऊ शकणार आहे.
क गटात चुरस
क गटात तुल्यबळ देशांचा समावेश असल्यामुळे पुढल्या फेरीत पोहोचण्यासाठी कमालीची चुरस प्रकर्षाने दिसून येणार आहे. या गटामध्ये अफगाणिस्तान, युगांडा यांच्यासह वेस्ट इंडीज, पापूआ न्यू गिनी व न्यूझीलंड या देशांचा समावेश आहे. या गटातून दोन संघ पुढल्या फेरीत पोहोचणार आहेत.
या खेळाडूंकडून आशा
अफगाणिस्तानी संघातील बहुतांशी खेळाडू आयपीएलमध्ये दरवर्षी खेळत असतात. अफगाणिस्तानच्या निवड समितीनेही आयपीएलला प्राधान्य देत आपल्या संघाची निवड केली आहे. राशीद खान, रहमानुल्लाह गुरबाज, मोहम्मद नाबी, गुल्बदीन नैब, मुजीब उर रहमान, नवीन उल हक या खेळाडूंच्या कामगिरीवर अफगाणिस्तानचे या स्पर्धेतील भवितव्य अवलंबून असणार आहे.
नेपाळसमोर नेदरलँड्सचे आव्हान
टी-२० विश्वकरंडकातील ड गटातील साखळी फेरीची लढत उद्या पार पडणार आहे. नेदरलॅंड्स-नेपाळ यांच्यामध्ये ही लढत पार पडेल. नेदरलँड्स सहा वेळा टी-२० विश्वकरंडकात सहभागी झाला असून नेपाळचा संघ दोन वेळा या स्पर्धेत सहभागी झाला आहे. नेपाळचा संघ नेदरलँड्सचे आव्हान कसे परतवून लावतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.