Ashes Series Pat Cummins Video : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेतील पहिलीच कसोटी रंगतदार स्थितीत पोहचली आहे. इंग्लंडने पहिल्या डावात अवघ्या 7 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावाची आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. जो रूट झपाट्याने धावा करत होता. तर दुसऱ्या बाजूने ऑली पोप त्याला चांगली साथ देत होता. मात्र ही जोडी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने फोडली. त्याने पोपचा एका सुंदर यॉर्करवर त्रिफळा उडवला.
पहिल्या डावात 141 धावांची दमदार खेळी करणाऱ्या उस्मान ख्वाजाचा ऑली रॉबिन्सनने देखील एका उत्कृष्ट यॉर्करवर त्रिफळा उडवला होता. त्यावेळी त्याने अत्यंत आक्रमक सेलिब्रेशन देखील केले होते. याचा बदला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स इंग्लंडच्या दुसऱ्या डावात घेतला.
पॅट कमिन्स इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील 17 वे षटक टाकत होता. या षटकाचा शेवटचा चेंडू ऑली पोपने खेळला. कमिन्सने हा शेवटचा चेंडू वेगाने ब्लॉकहोलमध्ये टाकला. वेगाने आत येणाऱ्या चेंडूचा पोपला अंदाज आला नाही. त्याची बॅट चेंडू अडवण्यासाठी खाली यायच्या आतच ऑफ स्टम्प उडाली होती.
पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी उपहारापर्यंत इंग्लंडने 162 धावांची आघाडी घेतली होती. पहिल्या डावात इंग्लंडने 393 धावा करत आपला डाव घोषित केला होता. ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजाच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 386 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडने 7 धावांची आघाडी घेत आपला दुसरा डाव सुरू केला. मात्र चौथ्या दिवशीच्या उपहारापर्यंत इंग्लंडचा निम्मा संघ 155 धावात गारद झाला होता.
इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जो रूट 55 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. तर हॅरी ब्रुकने 52 चेंडूत 46 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून पॅट कमिन्स आणि नॅथन लॉयनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. खेळ थांबला त्यावेळी बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो क्रीजवर होते. उपहारानंतर या दोघांनी आक्रमक फलंदाजी करत आघाडी वाढवण्यास सुरूवात केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.