Pat Cummins Video : इतना सन्नाटा क्यु है भाई! वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कर्णधारचं ऑस्ट्रेलियात कसं झालं स्वागत...

Pat Cummins Video : इतना सन्नाटा क्यु है भाई! वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कर्णधारचं ऑस्ट्रेलियात कसं झालं स्वागत...
Updated on

IND vs AUS World Cup Final : आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने हा पराक्रम केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या क्रिकेट सामन्याला 1.30 लाखांहून अधिक प्रेक्षक पोहोचले होते.

आता ऑस्ट्रेलियन संघ ट्रॉफीसह आपल्या देशात पोहोचला आहे. संघाचा कर्णधार पॅट कमिन्सचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये तो ऑस्ट्रेलियातील सिडनी विमानतळावर दिसत आहे.

Pat Cummins Video : इतना सन्नाटा क्यु है भाई! वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कर्णधारचं ऑस्ट्रेलियात कसं झालं स्वागत...
अर्जेंटिना-ब्राझील सामन्यात राडा; पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये कित्येक फॅन्स रक्तबंबाळ! मेस्सीने घेतला मोठा निर्णय...

मात्र, ऑस्ट्रेलियन संघ किंवा त्याच्या कर्णधाराचे स्वागत करण्यासाठी तेथील लोकांमध्ये विशेष उत्साह दिसत नव्हता. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियातील लोक मोठ्या संख्येने विमानतळावर आपल्या संघाचे स्वागत करण्यासाठी येतील, असे वाटले होते. जसे भारतातील किंवा इतर देशांतील विजेते संघ आणि खेळाडूंसोबत अनेकदा पाहायला मिळते, पण तसे काही झाले नाही. सर्व काही पूर्णपणे शांत होते.

पॅट कमिन्सचे बुधवारी सकाळी 22 नोव्हेंबरला सिडनी विमानतळावर आला. पण कर्णधाराच्या स्वागतासाठी मोजकेच मीडिया वाले उपस्थित होते, सामान्य लोकांचा पत्ता नव्हता. याउलट भारतात क्रिकेटपटूंचे जल्लोषात स्वागत होत आहे.

आयपीएल जिंकल्यानंतरही या संघाचे आपल्या राज्यात भव्य स्वागत केले जाते. तर त्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, पॅट कमिन्सचे स्वागत करण्यासाठी एकच अधिकारी आहे. जो त्याच्याशी हस्तांदोलन करतो आणि नंतर त्याच्यासोबत जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.