ICC 2023 Men's Test Team: आयसीसीच्या सर्वोत्तम कसोटी संघात रोहित, विराट नव्हे 'या' 2 भारतीय खेळाडूंना संधी

संघात चार फलंदाज, एक यष्टिरक्षक, तीन अष्टपैलू आणि तीन वेगवान गोलंदाज आहेत.
ICC Men's Test Team Marathi news
ICC Men's Test Team Marathi news sakal
Updated on

ICC Men's Test Team of the Year for 2023

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2023 चा सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर केला आहे. संघाची कमान पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी या संघावर वर्चस्व गाजवले आहे.

सर्वोत्तम कसोटी संघात भारत आणि इंग्लंडचे प्रत्येकी दोन, श्रीलंका आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी एक खेळाडू आहे. संघात चार फलंदाज, एक यष्टिरक्षक, तीन अष्टपैलू आणि तीन वेगवान गोलंदाज आहेत.

ICC Men's Test Team Marathi news
Ind vs Eng कसोटीपूर्वी नेटमध्ये दिग्गज खेळाडू जखमी, टीम इंडियाच्या वैद्यकिय टीमची दमछाक

सलामीची जबाबदारी उस्मान ख्वाजा आणि दिमुथ करुणारत्ने यांच्याकडे देण्यात आली आहे. तर, केन विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर आणि जो रूट चौथ्या क्रमांकावर आहे. संघात ट्रॅव्हिस, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे तीन अष्टपैलू खेळाडू आहेत. त्याचबरोबर कमिन्स, मिचेल स्टार्क आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या रूपाने तीन वेगवान गोलंदाज आहेत. अॅलेक्स कॅरी संघात यष्टिरक्षक फलंदाज असेल.

ICC Men's Test Team Marathi news
Virat Kohli : अयोध्येत विराट कोहलीला धक्काबुक्की... काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य? जाणून घ्या

या संघात पाकिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचा एकही खेळाडू नाही. भारताकडून फक्त जडेजा आणि अश्विनला स्थान मिळाले आहे. तर ऑस्ट्रेलियातील ख्वाजा, हेड, कॅरी आणि स्टार्क हे स्थान मिळवण्यात यशस्वी झाले. इंग्लंडचा जो रूट आणि स्टुअर्ट ब्रॉड हे देखील प्लेइंग-11 मध्ये आहेत. ब्रॉडने गेल्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. याशिवाय श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन यांचाही या संघात समावेश आहे.

ICC चा सर्वोत्तम कसोटी संघ (2023) - उस्मान ख्वाजा, दिमूथ करुणारत्ने, केन विलियम्सन, जो रुट, ट्रेविस हेड, रविंद्र जडेजा, ऍलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, मिचेल स्टार्क, स्टुअर्ट ब्रॉड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.