Ind vs Aus : कोहली भाऊची दहशत! मैदानात उतरण्याआधी कमिन्सला भरलीय धडकी

पॅट कमिन्स म्हणाला आगामी टी-20 मालिकेत विराट कोहली आमच्या संघासाठी मोठे....
Pat Cummins on Virat Kohli
Pat Cummins on Virat Kohli
Updated on

Pat Cummins on Virat Kohli : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया मोहालीला पोहोचली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांची टी-20 मालिका 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. दोन्ही संघांमधला पहिला टी-20 सामना मोहालीत खेळवला जाणार आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स रविवारी पत्रकार परिषदे घेतली. कमिन्स म्हणाला की, आगामी टी-20 मालिकेत विराट कोहली आमच्या संघासाठी मोठे आव्हान असणार आहे. यादरम्यान कमिन्सने टीम डेव्हिडचे पदार्पण बाबतही बोलला आहे.

Pat Cummins on Virat Kohli
IND vs SA : पहिल्या T20 सामन्यावर संकट, स्टेडियममध्ये नाही ​​लाईट; सामना कसा होणार

विराट कोहलीच्या फॉर्ममध्ये परतण्याशी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात पॅट कमिन्स म्हणाला, 'मी आशिया चषक पाहिला नाही पण विराटने शतक झळकावल्याचे मला माहीत आहे. तो ए वन खेळाडू आहे. त्याला कधी ना कधी फॉर्ममध्ये यायचं होतं. तो आगामी टी-20 मालिकेत आमच्यासाठी आव्हान आहे.

टीम डेव्हिडबद्दल पॅट कमिन्स म्हणाला, टीम डेव्हिडला फलंदाजीची संधी मिळाल्यास तो जगभरातील देशांतर्गत लीगमध्ये जशी कामगिरी करत आला आहे, तशीच कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.

Pat Cummins on Virat Kohli
Ind vs Aus : शमीऐवजी 'या' खेळाडूला संधी, तीन वर्षांपासून खेळला नाही T20 सामना!

आशिया चषक स्पर्धेत विराट कोहली सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर राहिला. त्याने 5 सामन्यात 148 च्या स्ट्राईक रेटने आणि 92 च्या सरासरीने 276 धावा केल्या. कमिन्सने कोहलीच्या ज्या खेळीचा उल्लेख केला, तो कोहलीने शेवटच्या सुपर-4 सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध खेळला होता. कोहलीने या सामन्यात नाबाद 122 धावा केल्या. भारताला अंतिम फेरी गाठता आली नाही. पण कोहलीचे फॉर्ममध्ये पुनरागमन हे या स्पर्धेचे मुख्य आकर्षण होते आणि कमिन्स सहमत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.