PCB : पाकिस्तान क्रिकेट मध्ये भूकंप! बाबर आझमची कर्णधार पदावरून हकालपट्टी?

Babar Azam
Babar Azamsakal
Updated on

Pakistan Cricket Babar Azam : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. पीएसएल म्हणजेच पाकिस्तान सुपर लीग सध्या पाकिस्तानमध्ये खेळली जात आहे आणि जवळपास सर्वच मोठे खेळाडू त्यात सहभागी झाले आहेत. त्याचवेळी पाकिस्तानी संघाला आता काही दिवसांनंतर अफगाणिस्तानविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. याआधी एक मोठा बदल करण्यात आला आहे.

Babar Azam
NZ Vs SL WTC 2023: नेहमी भारतासाठी अपशकुन करणारी न्यूझीलंड शेवट बॉल मध्ये भारताला फायनलमध्ये पोहचवून गेली

पीसीबीने शादाब खान संघाचा नवा कर्णधार असल्याची घोषणा केली आहे. कर्णधारासोबतच संघातील 15 सदस्यांची घोषणा करण्यात आली आहे. पण या संघाची खास बाब म्हणजे बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानसोबत शाहीन शाह आफ्रिदीचे नाव नाही. त्यामुळेच त्यांना प्रश्न पडला आहे की बाबरची कर्णधार पदावरून हकालपट्टी झाली का काय ?

Babar Azam
IND vs AUS Test : भारत-ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना ड्रॉ! मालिका 2-1ने टीम इंडियाच्या खिशात

शादाब खान अफगाणिस्तानविरुद्ध संघाची कमान सांभाळताना दिसणार असल्याची घोषणा पीसीबीचे प्रमुख नजम सेठी यांनी केली आहे. संघाची घोषणा करताना पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी म्हणाले - शादाब खानची पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केल्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करू इच्छितो. शादाब खान गेल्या काही वर्षांपासून व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा उपकर्णधार आहे.

तीन सामन्यांच्या T20I दौऱ्यासाठी बाबर आझमच्या अनुपस्थितीत तो संघाचे नेतृत्व करेल हे तर्कसंगत आहे. मोहम्मद युसूफ यांची आम्ही अंतरिम प्रमुख आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. युसूफ गेल्या वर्षभरापासून फलंदाजी प्रशिक्षक होता.

Babar Azam
IND vs AUS Test : भारत-ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना ड्रॉ! मालिका 2-1ने टीम इंडियाच्या खिशात

हारून रशीद यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष संघासाठी पीसीबीच्या नवीन निवड समितीने वर्कलोड आणि खेळाडूंच्या रोटेशनचे व्यवस्थापन यावर नवीन धोरण तयार केले आहे. अफगाणिस्तानविरुद्धची मालिका आयसीसीच्या फ्युचर टूर्स प्रोग्रामचा भाग नसल्यामुळे निवडकर्त्यांना त्यांची नवीन योजना आजमावण्याची संधी मिळाली आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ :

शादाब खान(कर्णधार), अब्दुल्ला शफीक, आझम खान, फहीम अश्रफ, इफ्तिखार अहमद, इहसानुल्ला, इमाद वसीम, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, नसीम शाह, सैम अयुब, शान मसूद, तैब ताहिर, जमान खान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.