पाकिस्तान क्रिकेट (Pakistan Cricket) पुन्हा एकदा संकटात सापडले आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाने (New Zealand National Cricket Team) पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यानंतर इंग्लंडनेही (England) पाकिस्तान दौरा रद्द केला. या दोन्ही संघांनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कोट्यवधीचा फटका बसणार आहे. पाकिस्तान क्रिकेटवर पुन्हा एकदा संकटाचे ढग दाटून आले आहेत.
न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंडने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यानंतर पीसीबीचे नवनियुक्त अध्यक्ष रमीझ राजा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत आमच्या निशाण्यावर भारतीय संघ होता. त्यात आता आणखी दोन संघाची भर पडली आहे, असे रमीझ राजा यांनी म्हटले आहे. क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी न्यूझीलंड आणि इंग्लंडवरील रागाची भावना व्यक्त केली. न्यूझीलंड आणि इंग्लंडने पाकिस्तानचा दौरा रद्द करणे हे अयोग्य आहे. या गोष्टीची टी-20 वर्ल्ड कपमध्ये परतफेड करु. मैदानात त्यांना हिसका दाखवून देऊ, अशा भाषेत पाकिस्तान अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे.
न्यूझीलंडड आणि इंग्लंडने घेतलेल्या निर्णयातुन आम्ही खूप काही शिकलो. ज्यावेळी आम्ही त्यांच्या देशात जाऊन दौरा करतो त्यावेळी क्वारंटाईनचे कठोर निर्बंध पाळतो. यापुढे आम्ही हिताच्या दृष्टीनेच विचार करु. सुरक्षिततेसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर न्यूझीलंडने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी कोणताही चर्चा न करता थेट दौरा रद्द केला. किमान इंग्लंड दौऱ्यासंदर्भात चर्चा करेल, असे वाटले होते. पण त्यांनीही तेच केले, असा आरोपही रमीजज राजा यांनी केला आहे.
इंग्लंड महिला आणि पुरुष संघ पाकिस्तान दौऱ्यात 13 आणि 14 आक्टोबरला दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार होता. त्यानंतर इंग्लंड महिला संघ 17, 19 आणि 21 आक्टोबर या कालावधीत पाकिस्तान महिला संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिका खेळणार होता. पण न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही पाकिस्तानचा दौरा रद्द केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.