Asia Cup 2023 PCB chief Najam Sethi : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट बोर्ड हे यंदाच्या वर्षी होणाऱ्या आशिया कप 2023 च्या आयोजनावरून एकमेकांशी भिडले होते. यंदाचा आशिया कप हा पाकिस्तान आयोजित करणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आशिया कपमधील समावेळ गुलदस्त्यात आहे.
मध्यंतीर एशियन क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष जय शहा यांनी आशिया कप 2023 हा पाकिस्तानात नाही तर त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार असल्याचे जाहीर करून टाकले होते. यावरून तत्कालीन PCB चेअरमन रमीझ राजा यांनी भारतात होणाऱ्या वर्ल्डकपवर बहिष्कार घालण्याची धमकी दिली होती.
मात्र आता नवे पीसीबी प्रमुख नजम सेठी यांनी नरमाईची भुमिका घेतली. त्यामुळे एशियन क्रिकेट काऊन्सीलने नजम सेंठींसाठी चर्चेची दारे उघडली.
दरम्यान, नजम सेठी यांनी या सर्व घडामोडीवर काही वक्तव्य केली. सेठी म्हणाले की, 'अखेर एशियन क्रिकेट काऊन्सीलच्या अधिकाऱ्यांना भेटण्याची तारीख ठरली. मी 4 फेब्रुवारीला एशियन क्रिकेट काऊन्सीलच्या बैठकीला उपस्थिती लावणार आहे.'
सेठी म्हणाले की, 'आमची भुमिका काय असेल याबाबत आताच मी काही सांगू शकत नाही. मी आमची भुमिका मनात ठेवणार आहे आणि बैठकीवेळी याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र मी खात्रीने सांगतो की आमची भुमिका ही पाकिस्तान क्रिकेटच्या भल्याचीच भुमिका असेल.'
दरम्यान, बीसीसीआयबाबत सेठी यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले की, 'बीसीसीआयला वाटते की पाकिस्तानने भारताचा दौरा करावा मात्र बीसीसीआय पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास इच्छुक नाही. ही परिस्थिती आमच्यासाठी नवीन नाही.'
हेही वाचा : ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.