Pakistan Cricket Independence Day Video : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्वातंत्र्य दिनाला एक व्हिडिओ शेअर केला होता. मात्र हा व्हिडिओ पाहून पीसीबीचं कौतुक करण्याऐवजी लोकांनी त्यांना चांगलंच फैलावर घेतलं. कारण या व्हिडिओत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि दिग्गज माजी कर्णधार इम्रान खान (Imran Khan News) यांना वगळण्यात आलं होतं.
इम्रान खान यांना व्हिडिओतून वगळण्याचं नेमकं कारण अजून उघड झालेलं नाही. मात्र प्रचंड टीका होऊ लागल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपली चूक सुधारली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अजून एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने नवीन व्हिडिओ शेअर करत त्याला कॅप्शन वजा खुलासा केला की, 'पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वनडे वर्ल्डकप 2023 च्या निमित्ताने एक प्रमोशनल कॅम्पेन सुरू केलं आहे. एक व्हिडिओ 14 ऑगस्ट 2023 ला अपलोड करण्यात आला होता. त्याच्या लेंथमुळे हा व्हिडिओ छोटा करण्यात आला होता. त्यात काही महत्वाच्या क्लिप नव्हत्या. ही गोष्ट नव्या व्हिडिओत बदलण्यात आली आहे.'
पीसीबीच्या 14 ऑगस्टच्या व्हिडिओवर पाकिस्तानचा माजी खेळाडू वसिम अक्रमने (Wasim Akram) देखील जोरदार टिका केली होती. त्याने ट्विट केले होते की, 'मोठ्या विमानप्रवासानंतर मी श्रीलंकेत पोहचलो. त्यानंतर पीसीबीचा व्हिडिओ पाहताना मला आयुष्यातील सर्वात मोठा धक्का बसला. पाकिस्तानच्या इतिहासाच्या या छोट्या व्हिडिओतून इम्रान खान यांनाच वजा केलं.'
अक्रम पुढे म्हणाला 'राजकीय मतभेद हे एका बाजूला मात्र इम्रान खान हे जागतिक क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू आहेत. त्यांनी त्यांच्या काळात पाकिस्तानचा मजबूत संघ तयार केला. त्यांनी आम्हाला पुढचा मार्ग दाखवले. पीसीबीने हा व्हिडिओ डिलीट करून माफी मागयला हवी.'
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ (PTI) या राजकीय पक्षाची स्थापना केली. ते पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान देखील बनले. त्यांनी 2018 ते 2022 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधानपद भुषवले. मात्र त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. त्यांना अटक देखील झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.