Pele world class football player now share insta post: फुटबॉलचा देव असे ज्यांचे वर्णन केले जाते त्या पेले यांच्या प्रकृतीबाबत त्यांनीच एक पोस्ट शेयर केली आहे. जगभरात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ ज्या खेळाडूनं आपल्या देशाची सेवा केली चाहत्यांना निखळ आनंद दिला अशा पेले खेळाडूची उंची ही नेहमीच चाहत्यांच्या मनात आदराची राहिली आहे. त्यांची व्हायरल झालेल्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
काही दिवसांपूर्वी पेले हे रुग्णालयात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांना कॅन्सरची लागण झाल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. मल्टिपल ऑर्गन्सचा फेल्युअऱचाही त्यांना त्रास जाणवत असल्याचे सांगण्यात आले होते. ३० नोव्हेंबर रोजी त्यांना साओ पाओलोमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची पोस्ट चर्चेत आली आहे.
पेले यांनी आपल्या त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, माझ्यावर उपचार करणाऱ्या सर्वांना धन्यवाद द्यावे लागतील. त्यांचे कष्ट मोठे आहेत. आता माझ्या प्रकृतीबाबत सांगायचे झाल्यास ती वयोमानाच्या हिशोबानं कमी जास्त होते आहे. माझा देवावर विश्वास आहे. त्याच्या ताकदीवर मी विश्वास ठेवतो. आतापर्यत मला माझ्या चाहत्यांडून खूप प्रेम मिळाले आहे. त्यांच्याकडून तेवढीच उर्जाही मिळाली आहे. वर्ल्ड कपमध्ये मी नेहमीच ब्राझीलच्या संघाला खेळताना पाहण्याची प्रार्थना देवाकडे केली आहे. यापूर्वी पेले यांच्या मुलीनं खास पोस्ट शेयर करुन त्यांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिले होते.
हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने
पेले यांच्या करिअऱविषयी सांगायचे झाल्यास, त्यांनी १९५८, १९६२ आणि १९७० असा तीन वेळा ब्राझीलच्या वतीनं फिफामध्ये भाग घेतला. त्यात त्यांनी ९२ मॅचेसमध्ये ७७ गोल केले होते. तो एक आगळा वेगळा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. पेले यांनी त्यांच्या एकुण कारकीर्दीमध्ये १३६२ सामने खेळले. त्यात त्यांनी तब्बल १२८१ गोल केले. पेले यांनी फुटबॉलमध्ये जे नाव कमावलं, त्यांची इतकी लोकप्रियता आणखी कोणत्याही प्लेयरला मिळालेली नाही. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी १९५८ साली वर्ल्डकपमध्ये भाग घेतला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.