Pro Kabaddi 11:'...तर डुबकी किंग आहेस हे विसरून जा', परदीप नरवालला बंगळुरूचे कोच रणधीर यांचा मोलाचा सल्ला

Coach Randhir Singh Sehrawat gave valuable advice to Pardeep Narwal: प्रो कबड्डीच्या ११ व्या हंगामात बंगळुरू बुल्सकडून खेळणाऱ्या परदीप नरवालचे मनोबल गेल्या हंगामानंतर ढासळलेले होते. पण आता नव्या हंगामापूर्वी प्रशिक्षक रणधीर सिंग यांनी त्याला मोलाचा सल्ला देत त्याचं मनोधैर्य कसं उंचावलं हे सांगितलं आहे.
Pardeep Narwal | Randhir Singh Sehrawat
Pardeep Narwal | Randhir Singh SehrawatSakal
Updated on

Randhir Singh Sehrawat advice to Pardeep Narwal: प्रो कबड्डीच्या नव्या हंगामाला ऑक्टोबरमध्ये सुरुवात होत आहे. यंदा प्रो कबड्डीचा ११ वा हंगाम असणार आहे. हा हंगाम येत्या १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पहिलाच सामना १८ ऑक्टोबरला तेलुगू टायटन्स विरुद्ध बंगळुरू बुल्स यांच्यात होईल. त्यामुळे पहिल्याच सामन्यात परदीप नरवाल आणि पवन सेहरावत यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे.

या सामन्यापूर्वी शनिवारी बंगळुरू बुल्स संघाकडून यंदा खेळणाऱ्या परदीपने आणि संघाचे प्रशिक्षक रणधीर सिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

परदीपने बंगळुरू बुल्सकडूनच प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामातून पदार्पण केले होते. तेव्हा बंगळुरू बुल्सचे प्रशिक्षण रणधीर हेच होते. त्यामुळे आता पुन्हा ११ व्या हंगामातही ही गुरु-शिष्यांची जोडी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. याबद्दल दोघांनीही आनंद व्यक्त केला.

परदीप हा प्रो कबड्डीमधील सर्वात यशस्वी रेडर आहे. पण गेल्या काही हंगामात त्याचा फारसा फॉर्म दिसला नव्हता. त्यामुळे तो निराशेतही गेला असल्याचे रणधीर यांनी सांगितले. तसेच परदीपनेही सांगितले की आता तो पुन्हा स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे.

Pardeep Narwal | Randhir Singh Sehrawat
PKL 11 Schedule: प्रो कबड्डी लीगच्या ११व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या पुण्यात कधी, कोणात रंगणार लढती

तो म्हणाला की रणधीर सिंग अनुभवी प्रशिक्षक आहेत, त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा खेळण्यास सज्ज आहे. त्याने असंही स्पष्ट सांगितलं की तो ज्या डुबकीसाठी ओळखला जातो, त्याची ही चाल खेळण्यास गेल्या काही हंगामापासून तो संघर्ष करत आहे. पण यावेळी ११ व्या हंगामात त्याने काही नवे कौशल्य आत्मसात केले आहेत. तसेच त्याने अशीही आशा व्यक्त केली की पहिल्या सामन्यात तेलुगूबरोबरच बेंगळुरु संघालाही तेवढाच पाठिंबा चाहत्यांकडून मिळेल.

याशिवाय रणधीर यांनी सांगितलं की परदीपला त्याच्या खेळण्यावर शंकाही निर्माण झाल्या होत्या. त्यांनी सांगितलं की मागच्या हंगामानंतर परदीप त्याच्या कारकि‍र्दीबद्दल गोंधळलेला होता. त्याचं मनोबल ढासळलं होतं.

पण त्यांनी त्याला प्रेरणा देताना सांगितलं होतं की बंगळुरु बुल्स त्याला लिलावात घेईल आणि तुला पाठिंबा देईल. त्याच्याकडे त्यांनी फक्त इतकी अट ठेवली होती की जर त्याला यशस्वी व्हायचे असेल तर त्याला तो दुसऱ्या हंगामात जसा होता, तसं वागावं लागेल. त्याला तो स्टार आहे, हे विसरून खेळावं लागेल.

Pardeep Narwal | Randhir Singh Sehrawat
Pro Kabaddi 11 हंगामाला १८ ऑक्टोबरपासून सुरुवात; पुण्यासह फक्त 'या' तीन ठिकाणी होणार सामने

"स्टारडम विसरून जा"

रणधीर यांना जेव्हा सकाळकडून प्रश्न विचारण्यात आला की त्यांनी मनोबल ढासळलेल्या परदीपला कसा धीर दिला.

त्यावेळी त्यांनी सांगितले की 'मी त्याला एक गोष्ट स्पष्ट सांगितली होती की तू स्टार परदीप नरवाल आहेस, हे विसरून जा आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात कर. जसा दुसऱ्या हंगामात तू माझ्याकडे आला होता, त्याप्रमाणेच मला विचार की सर कसं खेळायचं आहे. स्टारडम मागे जा. तुझं मनोबल आपोआप वाढेल.'

'जे नवे खेळाडू येतात, त्यांच्याकडूनही आम्ही प्रशिक्षक शिकतो. काहीमध्ये वेगळी प्रतिभा असते, काहींमध्ये वेगळी. काहींचा रिच चांगला आहे, कोणी स्लीप चांगले मारतो. त्यामुळे मी परदीपला सांगितले की जर तुला वर जायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल, तर तुला तू डुबकी किंग आहे हे विसरून दुसऱ्या हंगामाप्रमाणे शिकण्याची वृत्ती ठेवावी लागेल.'

परदीपला आत्तापर्यंत प्रो कबड्डीमध्ये १७० सामने खेळला आहे. त्याने १६९९ पाँइंट्स मिळवले आहेत. तो सर्वाधिक पाँइंट्स मिळवणारा खेळाडू आहे. तसेच त्याने यशस्वी रेड करतानाही सर्वाधिक १२७९ पाँइंट्स मिळवले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.