PKL 2021 : टॉलिवूड फिल्मपेक्षा भन्नाट शो; पहिल्यांदाच असं घडलं!

Telugu Titans vs Tamil Thalaivas2nd Match Tie
Telugu Titans vs Tamil Thalaivas2nd Match Tie Twitter
Updated on

PKL 2021 Telugu Titans vs Tamil Thalaivas 2nd Match : प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात पहिल्यांदाच ट्रिपल हेडरनं स्पर्धेची सुरुवात झाली आहे. यंदाच्या हंगामात रगतदार सामन्याची मेजवाणी पाहायला मिळणार असल्याचे संकेत पहिल्याच दिवसाच्या सामन्यात मिळाले. यू मुम्बाने (U Mumba) आणि बंगळुरु बुल्स (Bengaluru Bulls) यांच्यातील लढतीनंतर तेलुगु टायटन्स (Telugu Titans) विरुद्ध तमिळ थलायवाज (Tamil Thalaivas ) यांच्यात दुसरा सामना रंगला होता. या दोन्ही संघातील (Telugu Titans vs Tamil Thalaivas) लढत चांगलीच थरारक झाली. सरशेवटी सामना 40-40 असा बरोबरीत राहिला.

सामन्याच्या सुरुवातीला तमिळ थलायवाज संघाने आघाडी घेतली होती. एकेवेळी ते 9 गुणांनी आघाडीवर होते. पण तेलुगु टायटन्सने धमाक्यात कमबॅक केले. प्रो कबड्डीच्या आतापर्यंतच्या इतिहासात या दोन्ही संघातील सामना चौथ्यांदा बरोबरीत सुटल्याचे पाहायला मिळाले. हा एक विक्रमच आहे. प्रो कबड्डीमध्ये पहिल्यांदाच या दोन संघात चार वेळा सामना बरोबरीत सुटला आहे.

Telugu Titans vs Tamil Thalaivas2nd Match Tie
PKL Season 8 : जाणून घ्या 12 संघातील Raiders अन् Defenders

प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील दुसऱ्या लढतीत तमिळ थलायवाजचे चढाईपट्टू (raider) मनजीतने सर्वाधिक 12 गुण मिळवले. प्रपंजन याने 6 गुण करत त्याला उत्तम साथ दिली. दुसऱ्या बाजूला तेलुगु टायटन्सचा कर्णधार सिद्धार्थ देसाईने 11 आणि रजनीशने 6 गुण मिळवत संघाला कमबॅक करुन देण्यात मोलाची कामगिरी बजावली. यापूर्वी दोन्ही संघात 8 सामन्यात तीन सामने बरोबरीत सुटले होते.

Telugu Titans vs Tamil Thalaivas2nd Match Tie
U Mumba चा दिमाखदार खेळ; Bengaluru Bulls विरुद्ध विजयी सलामी

या सामन्यात पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघात जबरस्त खेळ पाहायला मिळाले. तेलुगु टायटन्सने पहिल्या हाफमध्ये 21 गुण मिळवले होते. तमिळ थलायवाजने 23 गुण मिळवले होते. पहिल्या हाफमध्ये टायटन्सने रेडमधून 13, टॅकल 6 आणि 2 ऑलआउट गुण मिळवले. दुसऱ्या बाजूला थलायवाजने रेडमधून 14, टॅकलचे 7 आणि 2 ऑलआउट गुण मिळवले.

Telugu Titans vs Tamil Thalaivas2nd Match Tie
IPL Auction : प्रेमाच्या आठवड्यात खेळाडूंवर होणार पैशांची बरसात!

एकावेळी टायटन्सचा संघ जवळपास 9 गुणांनी पिछाडीवर होता. पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात सामना त्यांच्या हातून निसटल्याचे दिसत होते. पण तमिळ थलायवाजने हार मानली नाही. दुसऱ्या हाफमध्येही तीच रंगत पाहायला मिळाली. तमिल थलायवाजने 17 गुण मिळवत कमबॅक केले. जो सामना ते गमावतील असे वाटत होते तो सामना त्यांनी बरोबरीत सोडवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.