PKL 8 : मेगा लिलावापूर्वी स्टार खेळाडूंना नारळ!

या महिन्याच्या अखेरीस 29 ते 31 दरम्यान मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.
Pro Kabaddi League auction
Pro Kabaddi League auction Twitter
Updated on

Pro Kabaddi League auction : प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाच्या लिलावाची तारीख ठरलीये. 29 ते 31 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या लिलावापूर्वी लीगमधील 12 संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केलीये. या मेगा लिलावात देश-विदेशातील अनुभवी आणि नव्या खेळाडूंना अ, ब, क आणि ड अशा चार गटांमध्ये विभागण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तीन वेळच्या चॅम्पियन पटना पायरेट्सने प्रो कबड्डी लीगमधील ऑल टाइम टॉपर गुण मिळवणाऱ्या (PKL's all-time leading scorer) प्रदीप नरवानला रिटेन केलेले नाही. त्याच्याशिवाय राष्ट्रीय कबड्डी संघाचा कर्णधार दीपक निवास हुड्डा, अजय ठाकूर, राहुल चौधरी, सिद्धार्थ देसाई आणि रोहित कुमार यांना देखील आपापल्या संघांनी रिलीज केले आहे. त्यामुळे या स्टार खेळाडूंवर पुन्हा एकदा बोली लागणार आहे.

या महिन्याच्या अखेरीस 29 ते 31 दरम्यान मुंबईत लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. लिलावापूर्वी प्रो कबड्डी लीगमधील फ्रेंचायझी संघांनी तीन वेगवेगळ्या गटातून 59 खेळाडूंना रिटेन केले आहे. यात 22 खेळाडू हे एलिट रिटेन प्लेयर गटातून Elite Retained Players (ERP) ,युवा खेळाडूंमधील 6 Retned Young Players (RYP) आणि उद्योत्मुक गटातील 31 खेळाडूंना New Young Players गटातून रिटेन करण्यात आले आहे.

Pro Kabaddi League auction
पुण्यातील स्टेडियमला दिलं जाणार 'गोल्डन बॉय' नीरजचं नाव

गतविजेत्या बंगाल वॉरियर्सने कर्णधार मनिंदर सिंग याच्यासह इराणच्या मोह्मद इस्माइल याला संघात कामय ठेवले आहे. मागील हंगामात स्कोअरिंग चार्टमध्ये टॉपर असलेल्या पवन कुमार शेखावतला बंगळुरु बुल्सने रिटेन केले. तर दबंग दिल्लीने प्रो कब्बडीच्या सातव्या हंगमातील Most Valuable Player नवीन कुमार याला आपल्या संघात कामय ठेवले आहे. इराणच्या फझल अत्रांचल (यु मुम्बा), परवेश भैंसवाल (गुजरात फॉर्च्युनजाएंट), विकाश खंडोला (हरियाणा स्टिलर्स) आणि नीतेश कुमार (युपी योद्धा) या खेळाडूंचाही रिटेन केलेल्या खेळाडूंच्या यादीत समावेश आहे.

Pro Kabaddi League auction
रोहित भाऊ जागा दे की! जाफरनं घेतली पृथ्वीची फिरकी

चार गटात पार पडणार लिलाव प्रक्रिया

देश-विदेशातील अनुभवी आणि युवा खेळाडूंना अ, ब, क आणि ड अशा चार गटांमध्ये वर्गवारी करुन लिलावात सहभागी करण्यात येणार आहे. अष्टपैलू, बचावपटू, आक्रमक अशा उपविभागांत खेळणाऱ्या खेळाडूंवर लिलावात बोली लागेल. प्रत्येक संघाकडे 4 कोटी 40लाख रुपये रक्कम उपलब्ध असेल. अ गटातील खेळाडूंची मूळ किंमत 30 लाख, ब गटात 20 लाख, क गटातील खेळाडूंची मूळ किंमत 10 लाख तर ड गटातील खेळाडूंची मूळ किंमत 6 लाख इतकी असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.